Viral Video: एखादी बाई व त्यातही ती आई असेल तर तिच्या शक्तीची परीक्षा चुकूनही घेऊ नये असं म्हणतात. मग तुम्ही अगदी बलाढ्य सिंह असाल किंवा बंदुक घेऊन आलेले शिकारी आई आपल्या बाळाच्या रक्षणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. अशाच एका जिराफ मातेचा सिंहिणीशी लढा देतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इंस्टाग्रामवर @AnimalWorlds11 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. ज्यात एक सिंहीणी जिराफाच्या बाळाला दाताने पकडून खेचत नेताना दिसत आहे पण याच वेळी जिराफ मातेने तिचा हल्ला ज्याप्रकारे परतवून लावला त्यामुळे अक्षरशः डोळे पांढरे होतील असे नेटकरी म्हणत आहेत.

आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता एक सिंहीण लहान जिराफच्या दिशेने धावत आहे, काही क्षणांनंतर मोठ्या सिंहिणीने जिराफाच्या बाळावर झेप घेतली आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला. जिराफ परत लढण्यास असमर्थ होता, एका वेळी तर जिराफ बाळाने हार मान्य करूनपळून जाण्याचा प्रयत्न सोडला. पण आई जिराफ बचावासाठी आल्यानंतर परिस्थिती बदलली. आता उलट सिंहिणीच आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागली.

Video: लढाई मातृत्वाची

हे ही वाचा<< विहिरीतून पाणी काढण्यासाठी बनवली विना विजेची भन्नाट मशीन; Video पाहून म्हणाल, पदवी नाही भावा डोकं हवं

जिराफ आईचे वीर कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले असून ते आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे.एकीकडे आईच्या वीरतेचे कौतुक करत असताना काही नेटकऱ्यांनी जिराफ बाळ आधीच मरण पावले असेल असे अंदाज बांधले आहेत. अनेकजण हा व्हिडीओ पाहून वाईट वाटत असल्याचे म्हंटले आहे तर काहींनी हा निसर्गाच्या अन्न साखळीचा भाग आहे अशा कमेंट केल्या आहेत.