Ram Mandir: राम मंदिरामध्ये प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघा आठवडा उरला आहे. केवळ भारतातच नाही तर परदेशात स्थायिक झालेले भारतीयही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लोक भजन गाऊन हा प्रसंग साजरा करताना दिसत आहेत. सध्या असाच एका राम भजन गाणाऱ्या मुस्लिम तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही तरुणी जम्मु काश्मीरमध्ये उरी येथे राहणारी आहे. विशेष म्हणजे या मुस्लिम विद्यार्थीनीने चक्क पहाडी भाषेमध्ये प्रभु रामाचे भजन गायले आहे. बतूल झेहरा(Batool Zehra) असे या तरुणीचे नाव असून पहाडी भाषेत गायलेले राम भजन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, “जम्मू-काश्मीरच्या उरी जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बतूल झेहराने २२ जानेवारी रोजी राम भजन गाऊन कश्मीर खोऱ्यातील लोकांना राम मंदिराच्या उद्घाटनाबरोबर जोडण्याचे काम केले आहे.” तिने रेकॉर्ड केलेल्या संदेशात म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी ११ दिवस उपवास करत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येकजण प्रभू श्री रामाचा आदर व्यक्त करणारे मधुर सूरामध्ये भजन गात आहेत. या कार्यक्रमात जम्मू-काश्मीरही तितक्याच उत्साहाने सहभागी होत आहे.”

हेही वाचा – सिनेमा हॉलमध्ये चक्क लॅपटॉपवर काम करतेय ‘ही’ व्यक्ती; Viral Video पाहून नेटकरी म्हणाले ,”शोऑफ…”

जहाराने सांगितले तिने राम भजन का गायले?

बतूल झेहराला पहाडी भाषेत राम भजन गाण्याबद्दल विचारले तेव्हा तिने सांगितले की,’मी बॉलिवूड गायक जुबिन नौटियालचे गाणे ऐकले आणि मला ते खूप आवडले. मला वाटलं की, “जर हिंदीत गाता येत असेल तर पहाडी भाषेत का गाता येणार नाही. मी ते पहाडी भाषेत लिहिले आणि गायले. तसेच मी हे गाणे रेकॉर्ड केले आणि माझ्या सरांना दाखवले. यानंतर माझ्या सरांनी ते सोशल मीडियावर पोस्ट केले, ज्यामुळे हे भजन व्हायरल झाले.”

हेही वाचा – Ram Mandir : अयोध्येला न जाता कसा पाहू शकता श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा? घरबसल्या कसे घेऊ शकता प्रभु रामाचे दर्शन?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नकारात्मक गोष्टी लोकांच्या मनातून नाहीशा झाल्या आहेत

बतूल झहरने सांगितले की, ‘मी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे आभार मानू इच्छिते, ज्यांच्यामुळे लोकांच्या मनातून अनेक नकारात्मक गोष्टी गायब झाल्या आहेत. माझ्या मुस्लिम बांधवांनीही माझे खूप कौतुक केले आहे. आपण जिथे राहतो त्या देशावर प्रेम केले पाहिजे. श्री राम यांच्या प्रामाणिकपणा आणि न्यायावर विश्वास असल्यामुळे त्यांना ‘पुरुषोत्तम’ म्हटले गेले.”