Viral Video : आई वडिल हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर पान आहे. आई वडिलांशिवाय आयुष्य पूर्ण होत नाही. आई वडिल मुलांसाठी जीव की प्राण असतात. सध्या असाच एक भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शाळकरी मुलगी तिच्या वडिलांविषयी बोलताना दिसते. तिचे वडिल दारू पितात पण तरीसुद्धा तिला ते हवे आहेत, असे ती सांगते. वडिलांविषयीचे प्रेम व्यक्त करत आणि आईच्या कष्टाविषयी सांगत ती सर्वांसमोर हंबरडा फोडते. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक शाळकरी चिमुकली सर्वांसमोर तिच्या आईवडिलांविषयी बोलताना दिसते. ती सांगते, “माझे पप्पा दारूचे व्यसन करतात. त्यांना दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. मम्मीने त्यांना जेवढे पैसे होते, त्या पैशात दवाखान्यात नेले होते पण दुसऱ्यावेळी आईकडे पैसे नव्हते. आईने शेत विकलं आणि सर्व पैसे दवाखान्यात घालवले. दुसऱ्या वेळेस पप्पाचा अपघात झाला होता. मी शाळेत होती मला घरी आल्यावर कळले की माझ्या पप्पांचा अपघात झाला आणि त्यांना लाइफलाइनमध्ये नेले होते. मला माझ्या पप्पाला भेटायला जायचं होतं मी फार रडत होते.”
ती पुढे सांगते, ” मला माझे पप्पा पाहिजे होते. माझ्या पप्पाचा एक हात काम करत नाही. माझी आईमुळे मी शाळेत शिकते. माझी आई रोज दुसऱ्याच्या घराला कामाला जाते आणि मला शिकवते. माझ्या आईचं नाव मी कधीच खराब करणार नाही. मी स्वत:ला चांगले वळण लावेल. मी खूप मोठी होऊन आईवडिलांना कायम सांभाळेन.”

हे सर्व बोलताना चिमुकला ढसा ढसा रडताना दिसते. चिमुकलीचे हे बोलणे ऐकून तिथे तिच्या शेजारी उभे असलेले समाज परिवर्तनकार वसंत हंकारे त्या चिमुकलीला मिठी मारतात आणि एका व्यक्तीला सांगतात की दहावीपर्यंतचे या मुलीचे पूर्ण शिक्षण मी करणार. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)

vasant_hankare_3232 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माझा बाप दारु पितो…तरी तो मला हवा आहे ..लेकीचा हंबरडा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर खरचं तुम्ही खुप चांगले काम करताय” तर एका युजरने लिहिलेय, “पोरीचा बाप झाल्याशिवाय बाप झाल्याचा आनंद मिळत नाही…हा माझा सत्य अनुभव आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाप समजून सांगता येत नाही आणि समजून घेता ही येत नाही. जसं जसं आपलं वय वाढलं जबाबदाऱ्या पडतील तस तसं बाप आपोआप समजतो…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक युजर लिहितो, “देव हा माणसात असतो…. आजकालच्या मुलींना प्रेरणा घेण्यासारखं आहे, बापाचं नाव हे कायम उंचावर ठेवता आलं पाहिजे त्याच्या सारखं पुण्य नाय आयुष्यात” आणखी एका युजरने लिहिलेय, “त्या मुलीच एक वाक्य खूप भारी वाटलं, माझ्या आईच नाव मी कधीच खराब करणार नाय” अनेक युजर्सनी या व्हिडीओमध्ये आईवडिलाचे महत्त्व सांगितले आहे. काही युजर्सनी वडिलांना दारू पिऊ नका, असे आवाहन सुद्धा केले आहेत.