Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी अनोखे जुगाड सांगताना दिसतो तर कधी कुणी थरारक स्टंट करताना दिसतो. काही लोक चांगले वाईट अनुभव सुद्धा शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणीने एक सुंदर अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी सांगते की तिने कसा तिच्या इमारतीच्या वॉचमन काकांचा वाढदिवस साजरा केला.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की इमारतीत राहणारे लोक वॉचमॅन काकांचा वाढदिवस साजरा करत आहे. याविषयी एका तरुणीने तिचा अनुभव सांगितला आहे. ती सांगते, “हे आहेत काका. हे खूप वर्षापासून बिल्डिंगचे वॉचमॅन आहेत. त्यांचा वाढदिवस होता पण ते एकटे बसले होते. त्यांचं कुटुंब त्यांच्याजवळ राहत नाही आणि हा बेड त्यांच्यासाठी संपूर्ण घर आहे. ते आम्हा सर्वांशी बोलतात पण त्या दिवशी ते एकटे होते. म्हणून आम्ही ठरवले की त्यांना सरप्राइज द्यायचं. एक छोटा केक घेऊन आम्ही सर्व एकत्र मिळून त्यांचा वाढदिवस साजरा केला. आणि जो आनंद आणि कृतज्ञता त्यांच्या चेहऱ्यावर होती, त्यातच सर्वकाही होते.”
ती पुढे सांगते,”आपल्या सर्वांना वाढदिवस आवडतो. आपल्यापैकी अनेकांसाठी वाढदिवस म्हणजे केक, हग्स, शुभेच्छा आणि गिफ्ट आहेत. पण काही लोकांना हे लक्झरी वाटतं, जे त्यांनी कधीही अनुभवलं नसतं. त्या क्षणी आम्हाला कळून चुकले की आपण आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे आणि काही वेळा प्रेमाची छोटीशी कृती एखाद्यासाठी सर्वस्व असतं. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

storiesbyaradhana या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ही पहिली वेळ आहे की काका त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून मला खूप आनंद झाला” तर एका युजरने लिहिलेय,”तुम्ही जे काही काकांसाठी केले त्याचे खरंच खूप कौतुक आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “एक छोटीशी मेहनत एखाद्याच्या चेहऱ्यावरील हसूचं कारण ठरू शकते.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.