Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ चर्चेत येतात तर कधी गाण्याचे व्हिडीओ व्हायरल होतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण आपली कला सादर करताना दिसतात. सध्या लग्नसमारंभ सुरू आहे त्यामुळे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लग्नातील डान्स व्हिडीओ व गमती जमतीचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका घरगुती कार्यक्रमात असं काही घडतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही. एक महिला डान्स करताना दिसते. तिच्याबरोबर असं काही घडतं की पाहून हसावं की रडावं असं वाटतं. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

डान्स करताना महिला धाडकन् आपटली!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका घरगुती कार्यक्रमात एक महिला डान्स करत आहे. तिच्या अवतीभोवती काही महिला बसलेल्या आहेत ज्या उत्साहाने या महिलेचा डान्स बघत आहे. ही महिला “बोल चुडिया बोले कंगना” या गाण्यावर डान्स करताना दिसते. तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव खूप सुंदर होते. ती डान्स करत होती पण मध्येच तिचा तोल जातो आणि धाडकन खाली पडते. त्यानंतर तेथील काही महिला तिच्या मदतीला धावतात तर काही महिला पोट धरून हसतात. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना धक्का बसेल तर काही लोकांना हसू आवरणार नाही. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

Amit Sharma या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ब्रेक फेल हो गये” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरं तर हसायला येऊ नये पण बॅक गिअर चांगला नव्हता.” तर एका युजरने लिहिलेय, “बापरे व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला”
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक तसेच मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. सध्या या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.