Mumbai Local Train Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधला आहे. व्हिडीओत तुम्हाला लोकलमधील कलेचे दर्शन होईल.

लोकल हा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकल ही मुंबईकरांसाठी जीव की प्राण आहे. या लोकल ट्रेनमधील सर्वच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुणी लोकल ट्रेनमध्ये नृत्य सादर करताना दिसत आहे. काही लोक तिची ही सुंदर कला कौतुकाने बघताना दिसत आहे. तिने गुलाबी रंगाचा खूप सुंदर लेहेंगा घातला आहे आणि तिचे ते क्लासिकल नृत्य पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “तुझ टॅलेंट हे देवाची भेट आहे” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

rawohit या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुंबई लोकल” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहियेय, “रेल्वेची गर्दी रोजच असते, पण अशा ‘कलेचं दर्शन’ रोज नसतं…!” तर एका युजरने लिहिलेय, “मी ह्यांना भेटली आहे बरेच वेळा… त्या खूप सुंदर दिसतात.. त्यांचं मन ही तितकंच सुंदर आहे… ह्या डब्या मध्ये आल्या की सगळ्यांचा चेहऱ्यावर एक हसू असतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबईचा फत्त पैसा दिसतो संघर्ष नाही !!” एक युजर लिहितो, “खरी अप्सरा” तर एका युजरने लिहिलेय, “ती किती गोड आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. खूप लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई लोकल ही शहरातील जीवनवाहिनी मानली जाते. लोकलनी दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्याने गर्दी आणि धावपळ ही इथली रोजचीच बाब असते पण अनेकदा लोकलमध्ये असे काही दृश्य दिसून येते. यापूर्वी मुंबई लोकल ट्रेनमधील असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.