Viral Video : असं म्हणतात केसामध्ये स्त्रीचे सौंदर्य दडलेले असते. लांब, दाट केस कुणाला आवडत नाही. महिला लांब केस ठेवण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. प्रत्येक महिलेला वाटतं की आपले लांब आणि दाट असे केस असावेत. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केसांची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. महिला केसांचे सौंदर्य जपण्यासाठी वाट्टेल ते प्रयत्न करतात. तुम्ही कधी कोणाचे लांब केस पाहिले आहे? अनेकदा सार्वजानिक ठिकाणी एखाद्याचे लांब केस पाहिल्यानंतर आपली त्यांच्या केसावरून नजर हटत नाही. सध्या हा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महिलेचे इतके लांब आणि दाट केस आहे की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

एवढे लांब अन् दाट केस कसे असू शकतात?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लांब केस असणारी तरुणी दिसेल. या तरुणीचे केस पाहून तुम्ही अवाक् व्हाल. तिचे केस इतके सुंदर व लांब आहेत की तुमची नजर हटणार नाही. केस इतके लांब आहे की ती जेव्हा चालते तेव्हा तिच्या केसांचा स्पर्श थेट जमिनीला होतो. विशेष म्हणजे तिचे केस खूप दाट आहे. असे केस तुम्ही कदाचित पहिल्यांदा पाहाल. या व्हिडीओवरून तुम्हाला कळेल की ही तरुणी केसांची खूप निगा राखते.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

extremelonghair_ai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स हे केस पाहून थक्क झाले आहेत. तर काही युजर्सनी आश्चर्य व्यक्त केले आहेत. एका युजरने लिहिलेय, “घरी फरशी पुसायला कामी येईल” तर एका युजरने विचारलेय,”ही तरुणी केसांना काय लावते?” आणखी एका युजरने लिहिलेय, “हे देवा तु कोणाकोणाला खूप छप्पर फाड देतो” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ एआय जनरेटेड असल्याचा आरोप केला आहे. काही युजर्सनी या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळे इमोजी शेअर केले आहेत.