असं म्हणतात, वय हा फक्त एक आकडा असतो. मनात जिद्द असेल, इच्छाशक्ती असेल तर वय कधीही आडवे येत नाही. सध्या थोडे जरी पायी चालावे लागले, तरी तरुण मंडळी थकतात. त्यांना पायी चालण्याचा कंटाळा येतो. काही लोक रोप वे च्या मदतीने गडकिल्ले किंवा पर्यटन स्थळे गाठतात पण नव्वद वर्षांहून अधिक वय असणाऱ्या एक आज्जी चक्क लेण्याद्री डोंगर पायी चढताना दिसत आहे. सध्या या आज्जीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आज्जीचे वय आणि डोंगर चढण्याची इच्छाशक्ती पाहून कोणीही थक्क होईल.
एका तरुणाने या आज्जीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला आज्जी लेण्याद्री डोंगरावर पायी चढताना दिसत आहे. आज्जीचे गडकिल्ल्याविषयीचे प्रेम अनेकांना प्रेरित करणारे आहे. या व्हिडीओमध्ये हा तरुण आज्जीला पायऱ्या चढण्यास मदतही करताना दिसतो.
लेण्याद्री डोंगर हा पुणे जिल्ह्यात जुन्नत तालुक्यात आहे. हे ठिकाण अष्टविनायकांपैकी एक आहे. तसेच येथे बौद्ध लेण्यासुद्धा आहेत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
justbeingpriyanka या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मी या सुपर आज्जीला भेटलो त्यांचे वय नव्वद वर्षांपेक्षा जास्त होते. अचानक झालेली ही भेट खरोखर प्रेरणादायक होती.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लेण्याद्री शिवजन्मभूमी मध्ये आपले स्वागत आहे” तर एका युजरने लिहिलेय, “ह्या एका व्हिडीओने आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन च बदलून टाकला” आणखी एका युजरने लिहिलेय, “जय शिवराय… हा व्हिडिओ जमेल तेवढा शेअर करा, कळू दे नव्या पिढीला खरे शिवभक्त म्हणजे काय ते . या माऊलीने साऱ्या जगाला दाखवून दिलं जिद्द आणि निष्ठा यांची सांगड घातली की काहीच अशक्य नसते…” एक युजर लिहितो, “तिच्यातल्या इच्छा शक्तीला सलाम” तर एक युजर लिहितो, “जय शिवराय आज्जी” आणखी एक युजर लिहितो, “आज्जीला मानाचा मुजरा”