Viral Video : एआय (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्त्तामुळे आयुष्य अगदी सोपी झाले आहे. या तंत्रज्ञानाने एक क्रांती घडवून आणली. माणसाची कामे सोपी केली. एवढंच नाही तर याचे दुष्परिणाम पाहायला गेले तर लोकांच्या नोकऱ्या गेल्या. एआयने माणसाला कधी हसवले तर कधी रडवले. जरी एआय माणसासारखा भावनिक नसला तर क्रिएटिव्हीटीने आणि बुद्धीने तो नाव कमावत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एआयच्या मदतीने एका नातीने आजीला सरप्राइज दिले आहे. नातीने एक एआयच्या मदतीने व्हिडीओ क्लिप तयार केली आहे ज्यामध्ये आज्जी दिवंगत आजोबांवर दिसतेय. एआयने केलेले हे क्रिएशन आज्जीला खूप आवडले आणि ती भावुक होताना दिसते.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आज्जी टिव्हीकडे बघून खळखळून हसताना दिसत आहे. टिव्हीमध्ये एक क्लिप सुरू आहे ज्यामध्ये ती आज्जी आजोबांच्या हातात हात धरून चालताना दिसत आहे. आजोबा देवाघरी गेलेत पण ही क्लिप पाहून आज्जीला पुन्हा दिवस जगल्यासारखे वाटले. हसता हसता ती भावुक होते आणि रडते. तेव्हा नात तिच्याजवळ येऊन तिला मिठी मारते. त्यानंतर घरातील इतर लोकही आज्जीजवळ येऊन तिला मिठी मारतात. एआयचे हे क्रिएशन पाहून आज्जी भावुक झाली. हा व्हिडीओ पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
apoorva_vijaykumar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वाढदिवसाच्या शुभेच्छा आज्जी. मला माहीत आहे आजोबांशिवाय जगणे कठीण आहे. त्यामुळे मी हे तुला आठवण म्हणून तयार केले. ते अजुनही इथेच आहे. प्रत्येक दु:खी आणि आनंदी क्षणात ते आहेत. तुला कदाचित दिसत नसेल पण ते तुला बघताहेत, तुझे रक्षण करताहेत आणि तुझ्याबरोबर पावलोपावली चालताहेत.”
जवळपास तीन लाख लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अरे देवा, एवढे निर्मळ प्रेम सर्वांना मिळू दे… अनंत वर्षांसाठी, या जीवनासाठी आणि पुढच्या जीवनासाठी प्रेम मिळू दे” तर एका युजरने लिहिलेय, “हा व्हिडीओ पाहून खूप रडले” आणखी एका युजरने लिहिलेय, “तू आजीचा दिवस खास बनवला पण त्याबरोबर आमचा पण दिवस खास बनवला” आणखी एका युजरने लिहिलेय, “एआयचा सर्वात चांगला वापर केला आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.