Viral Video : वडील आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा दिसतो. एका मुलासाठी वडील हा आयुष्याचा खरा आधारस्तंभ असतो. वडील सहसा प्रेम व्यक्त करत नाही पण त्याच्या कृतीतून तो व्यक्त होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वडील देवाघरी गेलेल्या मुलाचा टॅटू छातीवर काढताना दिसत आहे. टॅटू काढताना त्याच्या चेहऱ्यावर दु:ख दिसत आहे आणि तो टॅटू आर्टिस्ट तरुणाबरोबर संवाद साधताना सुद्धा दिसत आहे.

the_feel_tattoo या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ टॅटू आर्टिस्टने शेअर केला आहे. त्याने या व्हिडीओमध्ये या वडिलांची कहाणी सांगितली आहे.
“वय ७६ वर्ष, एकटा पडलेला बाप. एकुलता एक मुलगा गमावल्याचे दु:ख. मुलगा आणि बाप दोघेही डॉक्टर. मुलाला मोठा होताना बघून खूप सारे स्वप्न रंगवून बसलेला बाप.. आज अचानक मुलाच्या जाण्याने खचून गेला. मुलाची आठवण म्हणून सरांनी फेस टॅटू काढले. त्या बापाचं तडफडणारं काळीज बघून त्यांच्या सोबतच्या आठवणी ऐकून डोळ्यात पाणी आलं. डोळ्यातले अश्रु डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे असते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “डोळ्यातले अश्रू डोळ्यातच जिरवण्याची ताकद फक्त बापाकडे असते…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एका बापाचे मुलासाठी प्रेम बघून डोळ्यात पाणी आले” तर एका युजरने लिहिलेय, “आईचं प्रेम सर्वांना दिसतं. पण बापाचं लपलेलं प्रेम हे कधीच मुलांना दिसत नाही. शेवटी मुलांना बाबा पेक्षा आई महत्त्वाची वाटते. पण एकदा आयुष्यातून बाप या नावाचा देव गेला की त्याच्या असण्याची जाणीव होते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज या काकाची इच्छा पूर्ण करून दादा तूझ्या कष्टाचं चीज झालं… आज तुझी कला सार्थकी झाली..” एक युजर लिहितो, “बाप हा बापच असतो आयुष्यभर आपल्या मुलांसाठी लढत असतो. ज्या वयात बापाचा खांदा बनून बापाची सेवा करायची असते त्याच वयात स्वतः चा मुलगा गमावणं या पेक्षा मोठं दुःख कोणतंच नाही” तर एक युजर लिहितो, “शब्दच नाही…. हे त्या मुलांसाठी एक उत्तम उदाहरण जे आपल्या वडिलांना सहज बोलतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं…मुलगा मेल्यानंतर सुद्धा जो फक्त मुलांसाठी जगतो तो फक्त बाप असतो. जे तुम्ही करू शकत नाही ते फक्त बाप करू शकतो” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर इमोशनल कमेंट्स केल्या आहेत.