Viral Video : अनेकांना आपल्या घरी एका मुलीने जन्म घ्यावा, असे वाटते. मुली कुटुंबात प्रेम आणि आपुलकीचे वातावरण निर्माण करतात. मुलीमुळे घरात आनंद आणि चैतन्य दरवळते. वडीलांच्या लाडाची आणि आईची मैत्रिण असलेली लेक प्रत्येकाला हवी असते. मुलगी हे साक्षात अनेक जण त्यांना मुलगी व्हावी, म्हणून प्रार्थना करतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका कुटुंबात चक्क ५६ वर्षानंतर मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबातील सदस्य इतके खूश होते की त्यांनी तिचे धूमधडाक्यात स्वागत केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावरून तीन चार सजवलेल्या गाड्या एकामागे एक जात आहे. त्यानंतर पुढच्या दृश्यामध्ये फटाके फोडताना दिसत आहे. त्यानंतर एक सुंदर घर दिसेल जे फुग्यांनी खूप सुंदर सजवले आहे. अंगणात “वेलकम बेबी” अशी फुलांची रांगोळी काढली आहे. घर सुद्धा आतून खूप सुंदर सजवले आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक जोडपं बाळासह दारात उभे आहे आणि घरातील महिला या बाळाचे औक्षण करत आहे, त्या बाळाला ओवाळत आहे. त्यानंतर तुम्हाला दिसेल की चिमुकलीचे पाय कुंकवाच्या पाण्यात बुडवून एका पांढऱ्या रुमालीवर तिच्या पायाचे ठसे उमटवले आहे. त्यानंतर या चिमुकलीचे वडील तिच्या पायानी तांदळांनी भरलेले माप ओलांडते आणि या चिमुकलीचा गृहप्रवेश होतो. बेडरूम सुद्धा खूप सुंदर सजवली असते. त्यांच्या या सर्व कृतीतून त्यांचे प्रेम दिसून येते.५६ वर्षानंतर कुटुंबात जेव्हा मुलीचा जन्म होतो, तेव्हा तो आनंद मोजू शकत नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
dr.chahatrawal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” आमच्या चिमुकलीचे आम्ही स्वागत करतोय. ५६ वर्षानंतर आमच्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चिमुकलीने योग्य घर, योग्य लोक आणि योग्य आईवडील निवडले. देव तिला आशीर्वाद देवो” तर एका युजरने लिहिलेय, “मुलीचं इतकं छान स्वागत केलेलं पाहून आनंद वाटला” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप नशीबवान कुटुंब आहे” अनेक युजर्सनी या कुटुंबाचे कौतुक केले आहेत.