Viral Video : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यामातून पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. या लष्करी कारवाईनंतर पाकिस्तान सातत्याने भारतातील शहरांवर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. यावर सुद्धा भारत चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. सोशल मीडियावर भारतीय सैन्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ खूप भावुक करणारे आहेत. अशातच एक जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली चक्क जवानाच्या पाया पडताना दिसत आहे. या चिमुकलीवर तिच्या पालकांनी खूप चांगले संस्कार केले, अशा आशयाचे मेसेज युजर्स या व्हिडीओवर करत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला काही अंतरावर काही जवान उभे असलेले दिसेल. तितक्यात एक चिमुकली दिसेल जी धावत धावत एका जवानाजवळ जाते. जवान तिची विचारपूस करणार तितक्यात ती त्या जवानाच्या पायाला स्पर्श करत त्याच्या पाया पडते. तिला पाया पडताना पाहून त्या जवानाच्या चेहऱ्यावर व तिथे उभे असलेल्या इतर जवानाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य येते. जवान हे पाहून थक्क होतो. पुढे ती चिमुकली धावत परत येत असते पण मध्येच थांबते आणि त्या जवानाला सॅल्यूट करते तेव्हा तो जवान सुद्धा तिला बघून सॅल्युट करतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DJdT5dLomj9/?igsh=d240aXgzbjdna2Rv

marathi_speaker या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “संस्कार असावे तर असे ! निरागस मुलीच्या कृतीमुळे डोळे पाणावले” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलेय, “भारतीय संस्कार” तर एका युजरने लिहिलेय, “या चिमुकलीच्या आईवडिलांना नमस्कार” आणखी एका युजरने लिहिलेय, “जय जवान, जय किसान” एक युजर लिहितो, “सर्व काही संस्काराचा खेळ आहे. चांगले संस्कार माणूस घडवतो. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी या चिमुकलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.