Viral Video : महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा स्वत:चा एक इतिहास आणि संस्कृती लाभलेली आहे. प्रत्येक शहराची एक आगळीवेगळी ओळख आहे. माणुसकी जपणारं शहर म्हटलं की ओठांवर आपोआप आज आपण कोल्हापूर हे नाव येतं. माणुसकी जपणाऱ्या या शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सोशल मीडियावर कोल्हापुरचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण कोल्हापुरातील माणुसकी दाखवतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा तरुण नेमकं काय करतो, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण काकडी विक्रेता आज्जीबरोबर संवाद साधताना दिसतो.

तरुण – आई ऐक की.. येताना माझं पाकीट पडलं. मित्रांना बोलावलं फोन करून पण तो येईना झाला. भूक लागली.. दोन काकडी दे ना खायला मला

आज्जीबाई – (काकड्या त्या तरुणाच्या हातात देऊन ) बास का?

तरुण – बास

आज्जीबाई – आलास तर उद्या पण ये मी हाय उद्या पण इथं

तरुण – मित्राला फोन केला पण मित्रच येईना झाला

आज्जीबाई – अशा वेळी कुणावर विश्वास ठेवायचा नाही

तरुण – कधी यायचा तोपर्यंत इथे थांबून पण काय करू ..भूक लागली आहे

आज्जीबाई – कापून देऊ की खायला आणलेला डबा देऊ

तरुण – काय

आज्जीबाई – डबा आणलेला खायला देऊ का?

तरुण – नको नको… तुम्ही काय खाणार मग

आज्जीबाई – आम्ही काय तर बघतो खायला आम्ही काय एक वेळ उपाशी राहू शकतो

तरुण – नको नको.. बोललास आहास भरपूर मोठ झालं झालं. कोल्हापूर आपल्या माणसाच मन काय आहे, किती मोठं आहे.. हे आपण व्हिडीओ करून दाखवतो सगळ्या जगाला… हे बघ तिथं कॅमेरा लावला आहे. येऊ आई…

आज्जीबाई – काकड्या घे की

तरुण – पैसे देऊन घेतो

आज्जीबाई भरपूर काकड्या त्या तरुणाच्या हातात देते

तरुण – एवढं कुठे चारच दे की…

शेवटी तरुण काकडी विकत घेऊन आजीचा निरोप घेतो.

सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आज्जीबाईने दाखवलेली ही माणुसकी पाहून कोणीही थक्क होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral video

View this post on Instagram

A post shared by Don? (@kolhapuri_pranks)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

kolhapuri_pranks या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोल्हापुरी माणुसकी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही एक वेळ उपाशी राहू शकतो, असं म्हणणारी शेवटची पिढी ..” तर एक युजर लिहितो, “हीच पिढी खूप निष्पाप आणि नि:स्वार्थ होती. आता अशी माणसं भेटणं खूप अवघड आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “गर्व आहे मी कोल्हापूरकर असल्याचा, आवडला भावा” अनेक युजर्सनी कोल्हापुरच्या माणुसकीचं कौतुक केलं आहे