Viral Video : सोशल मीडियावर दर दिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क होईल. सध्या वारी सुरू आहे त्यामुळे वारीतील सुद्धा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मामा भाची सुंदर ठेका धरलेला दिसत आहे. मामा भाचीचा नाच पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका सोसायटीमध्ये लोक जमलेली आहे. काही वारकरी सुद्धा येथे उभे आहे आणि सर्वजण चिमुकली आणि तिच्या मामाचा नाच कौतुकाने पाहताना दिसत आहे. व्हिडीओ तुम्हाला दिसेल की वारकरी मामा आणि त्यांची भाची टाळाच्या गजरावर नृत्य करत आहे. याला फुगडी नाच सुद्धा म्हणतात. फुगडी खेळण्यापूर्वी जो ठेका धरला जातो त्याला फुगडी नाच म्हणतात. ते दोघेही अप्रतिम असे नृत्य करत आहे. चिमुकल्या भाचीने नऊवारी नेसली आहे आणि ती अप्रतिम असे नृत्य करत आहे तर मामा सुद्धा तिच्याबरोबर नृत्याचा आनंद लुटताना दिसत आहे. या दोघांना पाहून जमलेले लोक सुद्धा यांची जुगलबंदी बघत त्यांना प्रोत्साहन देत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
sonya_captionking0048 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर लिहिलेय, “मामा भाची नाचून फुगडी नाद भक्तीचा, सोहळा आनंदाचा विठ्ठल विठ्ठल”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मामा भाची डान्स खूपच छान राम कृष्ण हरी” तर एका युजरने लिहिलेय, “भाची मामा सारखीच डान्स करते” आणखी एका युजरने लिहिलेय, “जय हरी विठ्ठल” एक युजर लिहितो, “छान डान्स एकच नंबर” तर एक युजर लिहितो, “रामकृष्ण हरी माऊली” काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी ‘राम कृष्ण हरी’असे लिहिले. यापूर्वी सुद्धा वारीतील नृत्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.