उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधील जाखनिया येथील आमदार बेदी राम यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आमदार एका रस्त्याच्या बांधकामाची पाहणी करताना दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे आमदार ज्या रस्त्याचे बांधकाम पाहण्यासाठी आले होते, तो रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा होता की, आमदारांनी लाथ मारताच रस्त्याते डांबर निघत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ठेकेदाराच्या या निकृष्ट बांधकामाला पाहून आमदार खूप चिडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. शिवाय ते रागारागात, “असा रस्ता बनवला जातो का? या रस्त्याचा कंत्राटदार कोण आहे?” असं म्हणताना दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गाजीपूर येथील जखनिया विधानसभेच्या जंगीपूर-बहारीयाबाद येथील रस्त्याशी संबंधित आहे. या रस्त्याच्या पाहणी करण्यासाठी जखानिया विधानसभेचे आमदार बेदी राम आले होते. यावेळीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये आमदार रस्त्यावर बुट घासताना दिसत आहेत, धक्कादायक बाब म्हणजे बुट घासल्याने रस्ता उकरल्याचं दिसत आहे. सुमारे साडेचार किलोमीटरचा हा रस्ता पीडब्ल्यूडी करत असून त्यापैकी एक किलोमीटरचा रस्ताही तयार करण्यात आला आहे.

हेही पाहा- Video: पूजा सुरु असतानाच भाविक पडले 50 फूट खोल विहिरीत; अनेकजण थेट…

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार बेदी राम म्हणाले, “मी माझ्या कार्यालयात बसून लोकांच्या समस्या ऐकत होतो. त्यादरम्यान मला या निकृष्ट रस्त्याच्या बांधकामाची माहिती मिळाली. त्यानंतर मी घटनास्थळी गेलो. तेथे पीडब्ल्यूडीचा कोणीही अधिकारी नव्हता. यावेळी मी कंत्राटदाराला अधिकाऱ्यांबाबत विटारलं आणि पीडब्ल्यूडीच्या उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.”

हेही पाहा- घाबरा रे! पठ्ठ्या चक्क किंग कोब्राला घालतोय अंघोळ, Video पाहून तुम्ही म्हणाल, ‘काय माणूस आहे’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार म्हणाले, “रस्ता चांगल्या पद्धतीने बांधला जात नव्हता शिवाय हा रस्ता वर्षभर किंवा सहा महिनेही टीकला नसता अशा अशा पद्धतीने त्याचं बांधकाम केले जात होतं. त्यामुळे सरकार आणि माझी दोघांचीही बदनामी झाली असती, माझ्या भागातील जनतेला मी सांगितले आहे की, कुठेही निकृष्ट बांधकाम दिसले तर त्वरित कळवा असं सांगितले होतं. अशातच या बांधकामाबद्दलची माहिती मिळताच मी घटनास्थळी जाऊन ते तत्काळ बंद केले.” दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी एक समिती स्थापन केली असून चौकशीनंतर संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे.