भारतात ट्रक टेम्पोच्या मागे लिहिलेल्या घोषणा, सूचना लक्ष वेधून घेत असतात. केवळ बोधच नाही तर उत्कृष्ट सुलेखन कौशल्यही यातून दिसत असतं. लिहिणारा उत्तम प्रकारे अक्षरांची मांडणी करत लिहितो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंधनाच्या टाकीवर ‘Diesel’ हा शब्द सोप्या पद्धतीने लिहिताना चित्रकार दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही आश्चर्यचकीत झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वेगाने शब्द लिहिण्याची कला पाहून अनेक जण स्तुती करत आहेत. तसेच व्हिडिओ वारंवार पाहत आहेत.

२२ सेकंदांचा व्हिडिओ ‘गब्बर सिंग’ या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. तासाभरात अनेकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हायरल व्हिडिओला आता ८ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि १ हजाराहून अधिक रीट्विट्स मिळाले आहेत.

चित्रकाराने दाखवलेले अप्रतिम कॅलिग्राफी कौशल्य पाहून नेटिझन्स थक्क झाले. तो शेवटचा स्ट्रोक पूर्ण करेपर्यंत काहीजण अंदाज बांधत राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१९ मध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका चित्रकाराने ट्रकच्या फ्लॅपवर ‘STOP’ लिहिण्यासाठी २० पेक्षा कमी स्ट्रोक वापरले होते. त्या व्हिडिओलाही नेटकऱ्यांनी पसंती दिली होती.