Viral Video : सोशल मीडियावर रस्त्यावरील अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. गेल्या काही वर्षांमध्ये अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाहतूक नियम न पाळणे, हे त्यामागील सर्वात मोठं कारण आहे. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे ऑटो आणि पीएमटीची धडक झाली. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ऑटोचालक पीएमटीबसचालकाला शिवीगाळ आणि मारहाण करत आहे. हा व्हिडीओ पुण्यातील आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल चूक कोणाची आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

या व्हायरल व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे हा व्हिडीओ दांडेकर पूलाकडून सारसबागला जाणाऱ्या रस्त्यावरील आहे. या रोडवरील सिग्नल सुटला आणि एक रिक्षा चालक सिग्नल तोडून पीएमटी बसला आडवा आला. त्यामुळे बसची आणि रिक्षाची जोरात धडक झाली. त्यानंतर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की रिक्षाचालक रिक्षेतून उतरून बस चालकाजवळ येतो आणि त्याला शिवीगाळ करतो. त्यानंतर तो बसचा दरवाजा उघडतो आणि बसचालकाला मारहाण सुद्धा करतो. हा व्हिडीओ पाहून पुण्यात नेमकं चाललं तरी काय? असा प्रश्न तुम्हाला पडेल.

व्हायरल व्हिडीओ

vibes_77077 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दांडेकर पुल ते सारसबाग रोड वर सिग्नल सुटला आणि रिक्षा चालकाने सिग्नल तोडून PMT बसला आडवा आला. जोरात धडक झाली, नंतर रिक्षा ड्रायव्हरने उतरून बस ड्रायव्हर ला शिवीगाळ करून मारहाण केली…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चूक कोणाची पण असेल…पण त्या शिव्या देणाऱ्याला पहिला अटक करा” तर एका युजरने लिहिलेय, “पुण्यामध्ये पीएमटी आणि रिक्षावाले दोघेही सारखे करतात” आणखी एका युजरने लिहिलेय, “रिक्षावाल्याची चुकी आहे” एक युजर लिहितो, “अपशब्दचा वापर केलाय पब्लिक प्लेस मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे” तर एक युजर लिहितो, “पीएमटीबसवाले सरळ अंगावर आणतात गाडी” काही युजर्सनी पीएमटी बसचालकाची चूक असल्याचे सांगितले आहे तर काही यूजर्सनी ऑटोचालकाची चूक असल्याचे लिहिलेय.