Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी येथील मजेशीर पुणेरीपाट्यांचे तर कधी येथील ऐतिहासिक ठिकाणांचे. पुण्यातील गमती जमतीपासून गंभीर घटनांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील पीएमटी बसमधील एक भयानक दृश्य दिसून येईल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून संताप येईल. नेमकं काय प्रकरण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल. (video of pune pmt bus never travel like this by bus shocking video goes viral)

पुणेकरांनो, पाच मिनिट उशीर होईल पण असा प्रवास करू नका

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक पीएमटी बस दिसेल. ही पीएमटी बस प्रवाशांनी गच्च भरली आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बसमध्ये एवढे लोक भरलेले आहेत की लोकांना उभं राहायला सुद्धा नीट जागा नाही. हा व्हिडीओ तुम्हाला दिसेल की काही प्रवासी पीएमटीच्या समोरच्या गेटवर लटकून प्रवास करत आहेत तर काही प्रवासी पीएमटीच्या मागील गेटवर लटकून प्रवास करत आहे. यात काही विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे. हा जीवघेणा प्रवास पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “पुण्याची लोकल”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

craz.ypunekar_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुमचं काय मत आहे यावर”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकदा कर्वेनगर ब्रीज खाली येऊन बघा सकाळी” तर एका युजरने लिहिलेय, “आमचं पुणे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबईला येऊन बघा, गर्दी काय असते खरी ते समजेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यात अनेकदा पीएमटी बसमध्ये गर्दी दिसून येते. ऑफिस, शाळा , कॉलेजला वेळेत पोहचण्यासाठी प्रवासी जीवघेणा प्रवास करताना दिसतात. पण असे करू नये. पाच मिनिटे उशीर झाला तरी चालेल पण जीवाशी खेळू नये आणि सुरक्षित प्रवास करणे महत्त्वाच आहे.