Viral Video : महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी ८ मार्च हा महिला जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. महिलांच्या समान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देतो व त्यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकतो.

महिलादिनानिमित्त सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. लोक वेगवेगळ्या पद्धतीने महिलांना शुभेच्छा देत आहे. काही लोक डान्स करून, तर काही लोक गाणी, कविता, शायरी, चारोळ्या म्हणत महिलांना शुभेच्छा देत आहे. काही लोक हटके व मजेशीर पद्धतीने महिलांना शुभेच्छा देताना दिसत आहे.

सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने पाटीवर महिलांविषयी मजेशीर संदेश लिहिला आहे आणि ही पाटी हातात घेऊन तो रस्त्यात उभा आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

हल्ली तरुण मंडळी पाटीवर कधी मजेशीर तर कधी भावनिक संदेश लिहितात आणि ती पाटी हातात घेऊन रस्त्यावर उभे राहतात. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये सुद्धा एका तरुणाने पाटीवर महिला दिनानिमित्त एक मजेशीर संदेश लिहिलेला आहे. या पाटीवर लिहिलेय, “पुरुष कितीही धाडसी असला तरी ५०० रुपयांची वस्तू १०० रुपयांना मागण्याचे धाडस फक्त स्त्रीचं करू शकते.”

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा” त्याच्या पाटीवरील संदेश वाचून येणारे जाणारे लोक वाचताना दिसत आहे. अनेकांना हा संदेश आवडला आहे. काही महिला मेसेज वाचून हसताना दिसत आहे तर काही लोक या संदेशाला सहमती दर्शवत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

View this post on Instagram

A post shared by Sahil Randhe (@_sahil_0919)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

_sahil_0919 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जरा जास्तच खरं बोललो का” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्या नंतर सोबत असलेल्या पुरुषाचा चेहरा पाहण्यासारखा असतो” तर एका युजरने लिहिलेय, “हे धाडस फक्त बाई माणूस करू शकतात” आणखी एका युजरने लिहिलेय, ” कोणीतरी असा आहे जो आमच्या ह्या कलेला धाडस समजतोय..नाहीतर बाकीच्यांना ही कला कंजुषी वाटते..” एक युजर लिहितो, “एकदम बरोबर बोललास भावा”