Dosa Aarti Video Viral: इंस्टाग्राम, फेसबूक, युट्यूवर रिल्स पाहणे हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता छंद झाला आहे. अनेक उत्साही इन्फ्लुएन्सर आणि स्वत:ला किएटर म्हणणारे लोक प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला की लगेच प्रसिद्धी मिळत नाही. सोशल मीडियावर रोज इतके व्हिडिओ रोज पोस्ट होतात पण मोजकेच व्हिडिओ असे असतात जे चर्चेत येतात. काही व्हिडिओ असे असतात की जो नवीन ट्रेंड घडवतात. सध्या असाच एका ट्रेंडिंग व्हिडिओची सर्वत्र जोरदार चर्चा होत आहे.
तुम्ही सोशल मीडियावर लोकांना त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांवरील प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने करताना दिसतात. कित्येकदा लोक आपल्या आवडत्या खाद्यपदार्थ तयार करण्याचा किंवा सजावटीसाठी हटके पद्धती शोधतात. सध्या अशाच एका व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिलांनी डोसा आरती गायली आहे जी सोशल मीडियावर इतकी ट्रेंड झाली आहे की सामान्य व्यक्तीपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी यावर व्हिडिओ बनवले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर अन् क्रिएटर डॅनी पंडीत यांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला आहे. डॅनी आणि मृणालाचा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये.
इंस्टाग्रामवर व्हिडिओ व्हायरल
इंस्टाग्रामवर @telusamanasaa नावाच्या पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये गुलाबी रंगाच्या ड्रेस परिधान गेलेल्या दोन महिला किचनमध्ये उभ्या असून डोसा तयार करताना दिसतात. दाक्षिणात्य भाषेत त्या दोघी डोसा गाणे म्हणताना दिसत आहे जे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या गाण्याला त्यांनी आरतीसारखी चाल लावल्यामुळे अनेकांनी डोसा आरती असे त्याचे वर्णन केले. व्हिडिओ अल्पावधीच तुफान व्हायरल झाला.
व्हिडिओने नेटकऱ्यांना प्रचंड आवडला
या व्हिडिओला इंटरनेटवरील लाखो वापरकर्त्यांनी पसंती दिली आहे. या व्हिडिओवर वापरकर्त्यांच्या मजेदार प्रतिक्रियाही आल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, ‘डोसा चालिसा.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘किती सुंदर आणि मजेदार! मी ते पुन्हा पुन्हा ऐकतो, पण मला ही भाषा बोलता येत नाही आणि समजतही नाही.’ आणखी एकाने वापरकर्त्याने लिहिले, ‘हे डोस चालिसा आहे. मला इडली अष्टकम देखील ऐकायला आवडेल.’
डॅनी पंडितने केली अफलातून नक्कल
हा व्हिडिओ तेव्हा आणखी व्हायरल झाला जेव्हा क्रिएटर डॅनी पंडितने हा डोसा आरतीवर व्हिडिओ बनवला. डॅनीने या गाण्यावर फक्त व्हिडिओ पोस्ट केला नाही तर दोन्ही महिलांची हुबेहूब नक्कलही केली. त्यानेही आणि त्याच्या मित्राने त्या महिलांप्रमाणेच गुलाबी रंगाची कुर्ती परिधान केली, केसांचे वीग लावून महिलांसारखेच वेषभुषा केली. महिलांच्या शैलीतच त्यानेही हे गाणे गायले. त्यांने गाण्यामध्ये स्वत:च्या शैलीतील काही ओळी देखील जोड्ल्या आहेत ज्या लोकांना पोट धरून हसण्यास भाग पाडतात.
मृणाल ठाकुरने केले रील
डोसा आरतीवर बॉलीवुड एक्ट्रेस मृणाल ठाकुरने देखील रील तयार केली आहे. व्हिडिओमध्ये मृणाल विचारत आहेत- ‘आज जेवायला काय आहे ?’ तेव्हा तिचे सहकारी “डोसा” गाण्यावर नाचतात. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे.
