तुम्ही लिफ्ट आणि एस्केलेटरचा वापर अनेकवेळा केला असेल. आजकाल रेल्वे स्टेशनपासून मॉल्सपर्यंत या सुविधा आपल्या सर्वांना मिळत आहेत. खेड्यापाड्यात नाही, पण छोट्या शहरांमध्ये बांधलेल्या मॉल्स वगैरेमध्ये एस्केलेटर पाहायला मिळतील. शहरांमध्ये राहणार्‍या लोकांना याबद्दल चांगलं माहीत आहे, परंतु ग्रामीण राहणार्‍या बहुतेक लोकांना याबद्दल माहिती नाही, मग एस्केलेटरवर चढण्यासाठी काय करावं? एस्केलेटरवर अनेकांना मजा करतानाही तुम्ही पाहिलं असेल. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडिया वर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ग्रामीण भागातल्या महिला पहिल्यांदा एस्केलेटरवर चढल्या आहेत. हा क्यूट व्हिडीओ एकदा पाहाच.

या व्हिडीओमध्ये साडी परिधान केलेल्या काही ग्रामीण महिला एस्केलेटरवरून येताना दिसतात. जेव्हा पहिली महिला एस्केलेटरवरून येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर काहीशा प्रमाणात भीती सुद्धा दिसून येते. जेव्हा एस्केलेटरवरून उतरायची वेळ येते तेव्हा तिचा पाय काहीसा डगमगतो. पाय ठेवताना तिचा काहीसा गोंधळ उडतो. हे पाहून एक माणूस त्या महिलेला सावरतो. हा एक अतिशय गोंडस क्षण आहे. मागे आणखी दोन महिला येतात. त्यांचा पोशाख पाहून त्या ग्रामीण भागातून आलेल्या आहेत, हे स्पष्ट होतं. एका महिलेला एस्केलेटरवरून उतरता येतं हे बघताच तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. हा एक अतिशय सुंदर व्हिडीओ आहे आणि तो पाहून तुमच्याही चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही.

आणखी वाचा : VIRAL : सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणारी ‘ती’ वकील महिला नक्की कोण? ३ महिन्यांपूर्वीच भाड्याने घर घेतलं होतं…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नेटकऱ्यांनी शोधली रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटातील मोठी चूक, तुम्ही पाहिली का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ कोलकातामधला असून इथल्या मेट्रो स्टेशनवर शूट करण्यात आलाय. हा व्हिडीओ विद्याधर जेना यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत २५ हजार पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर लोक हा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.