Viral Video : आज्जी आणि नातवंडांचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, आपुलकी, काळजी आणि जिव्हाळा दिसून येतो. आज्जी आपल्या नातवंडांवर खूप मनापासून प्रेम करते. त्यांच्या मनातलं अगदी क्षणात ओळखते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की आज्जी नातीच्या मनातील लगेच ओळखते व तिची इच्छा पूर्ण करते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल की काही मुलं खूप नशीबवान असतात ज्यांना आजीचं प्रेम मिळतं.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाऊस पडताना दिसेल. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुणी घरात येते आणि तिच्या आज्जीला म्हणते, ” आज्जी.. बाहेर कसला पाऊस पडतोय बघं” त्यावर आज्जी म्हणते, “बरोबर आहे पाऊस पडतोय तो.. तुझ्या मनातलं मी नाही ओळखणार तर कोण ओळखणार? थांब करतेय”
पुढे व्हिडीओत आज्जी कांदा कापताना दिसते. कापलेला कांदा स्वच्छ पाण्याने धुताना दिसते. त्यात मीठ, हळद, तिखट आणि बेसन घालून कांदा भज्यांचे मिश्रण तयार करताना दिसते. नंतर आज्जी पेटत्या चुलीवर कढई ठेवताना दिसते. त्यात तेल ओतते आणि गरम तेलातून कांदा भजी काढताना दिसते. त्यानंतर आज्जी चहा सुद्धा तयार करते. पुढे व्हिडीओत तिचे नातू व नात गरमा गरम कांदा भजी व चहाचा आस्वाद घेताना दिसतात. आज्जी सुद्धा भज्यांचा आस्वाद घेताना दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना त्यांच्या आज्जीची आठवण येईल तर काही लोकांना त्यांच्या बालपणीची आठवण येईल.
पाहा व्हायरल व्हिडीओ
bindhast_mulgi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नातू-नातीची फर्माइश” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजीच असते जी आपल्या नातवंडांच्या मनातला ओळखते…” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच खुप नशिबवान आहेत ते मुलं ज्या ना आजी च प्रेम मिळतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “आजी म्हणजे मायेचा सागर ” एक युजर लिहितो, “आजीची माया वेगळीच असते” तर एक युजर लिहितो, “माझ्या आजीची आठवण आली”