महाराष्ट्राला संस्कृतीचा मोठा वारसा लाभला आहे. संत महात्मांच्या ओव्या अभंगांपासून ते शाहिरांच्या पोवाड्यांपर्यंत आपल्यावर सर्वांचेच संस्कार झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत. त्यांच्या कथा ऐकून आपण मोठे झालो आहोत. आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला असला तरीही महाराजांबद्दल प्रत्येकाच्याच मनात तेवढाच आदर आणि अभिमान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास भारतातच नाही तर भारताबाहेरही केला जात आहे. जगभरातील लोकांना महाराजांबद्दल कुतूहल आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू काही ना काही शिकवणारा आहे. त्यामुळेच पुढील पिढीवर महाराजांचे संस्कार व्हावेत असे शिवाजी महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच वाटते. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला देखील नक्कीच आनंद होईल.

chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Budh Rahu Yuti 2024
१८ वर्षांनी एप्रिलमध्ये २ ग्रहांची महायुती; ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी? कोणाला मिळणार भरपूर पैसा?
Gold prices hit highs in gold market in Delhi
सोन्याच्या भावाची उच्चांकी गुढी; दिल्लीत भाव ७१ हजार ७०० रुपयांवर पोहोचला
Gudi Padwa 2024 Wishes messages and quotes in Marathi
Gudi Padwa 2024: गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज

जगातील सातवा सर्वात महागडा हिरा घालून हॉलिवूड अभिनेत्रीची पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती; भारतीय संतापले कारण…

या व्हिडीओमध्ये पुणे महानगरपालिका परिवहन मंडळाचे बस ड्रायव्हर एक पोवाडा गाताना दिसत आहेत. पीएमपीएमएलमधील एका प्रवाशाने हा व्हिडीओ शूट केला आहे. सिंहगड पायथा ते किल्ला या प्रवासात या ड्रायव्हरने छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकप्रिय पोवाडे गाऊन सर्व प्रवाशांना आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहासाबद्दल माहिती दिली आणि त्यांचा उत्साहही वाढवला.

पुणे महानगरपालिका परिवहन मंडळाच्या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “पीएमपीएमएलच्या एका प्रवाशाने काढलेल्या व्हिडिओ मध्ये आमचे कर्मचारी सिंहगड पायथा ते किल्ला या प्रवासात छत्रपती शिवाजी महाराजांचे लोकप्रिय पोवाडे गाऊन व आपल्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहासाबद्दल माहिती देऊन प्रवाश्यांनचा जोश आणि उत्साह वाढवताना दिसत आहेत.”

“कॅमेरामध्येच घुसून राहू का?” सततच्या व्हिडीओ शूटिंगला कंटाळलेल्या मुलाने वडिलांनाच धरलं धारेवर

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच भावला आहे. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करत म्हटलंय, “अभिनंदन! या ड्रायव्हरने मार्गदर्शक आणि इतिहासकार अशी दुहेरी भूमिका बजावली. आपल्याला आपल्या सर्व वारसा स्थळांवर अशा जीवंतपणाची गरज आहे. #जयमहाराष्ट्र #जयहिंद”