Viral video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल.
आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये एखाद्या महाकाय अजगराने एखाद्या व्यक्तीला जिवंत गिळल्याची दृष्यं पाहिली असतील. खास करुन हॉलिवूड चित्रपटांमध्ये असली दृष्यं अनेकदा दाखवली जातात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एका व्यक्तीला त्याच्या मित्रासमोरच गिळलं आहे. यावेळी मित्रानी टाहो फोडत काय केलं पाहा. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा अजगर जमीनीवर लोळत असून त्याच्या पोटत व्यक्ती त्यानं गिळला आहे. यावेळी हतबल मित्रानं अजगराच्या बाजूलाच बसून टाहो फोडला आहे. एवढंच नाहीतर ते अजगराला मारतानाही दिसत आहेत. यानंतर त्यांनी त्या व्यक्तीला आजगराच्या पोटातून बाहेर काढण्यासाठी अक्षरश: त्याला कापलं आहे. जगात सापांच्या अनेक प्रजाती आहेत. लहान साप लोकांना त्यांच्या विषाने मारतात; तर अजगरासारखे मोठे साप त्यांच्या भक्ष्याला गुंडाळून त्याची हाडं तोडून त्यांना जिवंत गिळतात. जंगलात राहणारे अजगर बहुधा लहान प्राण्यांना त्यांची शिकार बनवतात. पण आता माणसांनी जंगल तोडून, त्यात आपली घरं बनवायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत महाकाय साप आता माणसांच्या जवळ पोहोचू लागली आहेत. याच कारणामुळे नागरिकांच्या पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या अजगराच्या हल्ल्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DLxiBKiS2bO/?utm_source=ig_web_copy_link
हा जगातील सर्वात लांब साप आहे आणि तीन सर्वात वजनदार सापांपैकी एक आहे. संपूर्ण व्हिडीओ पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ oc_alpha.sp इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.