mumbai local crime: मुंबई लोकलनं प्रवास करणं काही सोपं काम नाही. आधी गर्दीतून वाट काढत डब्यात चढावं लागतं, मग जागा कुठे मिळेल हा अंदाज लावून त्या दिशेनं पळावं लागतं. आणि शेवटी संधी मिळताच चित्त्यासारखी झडप मारून सीट मिळवावी लागते. मुंबई लोकलमध्ये कोण काय करेल याचा नेम नाही. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबई – धावत्या विरार लोकलमधील लगेज डब्यात एका टोळीने खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये ६ तरुण आणि एक मुलगी बेधडकपणे ड्रग्ज घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावरील यूजर्स संतापले. ड्रग्ज सेवन करण्याची ही घटना १ सप्टेंबर रोजी लोकल ट्रेनमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे.

धावत्या लोकलमध्ये अंमली पदार्थांचे सेवन

मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व तरुण नालासोपारा स्टेशनवर खुलेआम ड्रग्ज घेत असल्याचा दावा एका यूजरने केला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोकांच्या गर्दीत एक तरुण न घाबरता ड्रग्स घेत आहे. तर दुसरा तरुण मोबाईलवर पावडर सारखा पदार्थ ठेवून त्याला ड्रग्ज ऑफर करत आहे. @ADARSH7355 नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये बसून ६ तरुण आणि एक मुलगी ड्रग्ज घेत असल्याचा दावा त्यांनी केला. युजरने असेही सांगितले की या मुलांच्या खिशात मोठ्या प्रमाणात नाणी होती.

कारवाई सुरु

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वे अधिकारी आणि लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी रेल्वे संरक्षण दलाला (आरपीएफ) घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. लोकल ट्रेनमध्ये ड्रग्ज घेणाऱ्या ६ तरुण आणि तरुणीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> मांजरीने बॅगेतून चोरले नोटांचे बंडल; मालकानं अख्ख घर पालथं घातलं अन् शेवटी…आगाऊ मांजराचा VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व रेल्वे संरक्षण दल आणि सरकारी रेल्वे पोलिस चौक्यांना लुकआउट नोटीस पाठवण्यात आली आहे. हे तरुण रेल्वे परिसरात फिरताना आढळून आल्यास कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. या लोकांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही रेल्वे अधिकाऱ्याने सर्वसामान्य जनतेला केले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरीही चांगलेच संतापले आहेत, तसेच  या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.