Viral Video Girl Calls Father Instead Of Boyfriend: माणसाने रागात असताना, झोपेत असताना आणि नशेत असताना फोन बाजूलाच ठेवावा असं म्हणतात. कारण जर तुम्ही या स्थितीत कॉल उचलले किंवा बोलायला गेलात तर नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. असाच काहीसा प्रकार या व्हिडिओमधील तरुणीसह घडला आहे. इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एका मैत्रिणीचा प्रॅन्क दुसरीच्या चांगलाच अंगाशी आल्याचे दिसत आहे. यात एका तरुणीने झोपेत असताना बॉयफ्रेंड समजून बाबांचा कॉल उचलून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.

खरं पाहायचं झालं तर यात तिची पण काही चूक नाही कारण झोपेत असताना तिची एक मैत्रीण तिथे येऊन तिला म्हणते की तुझ्या बॉयफ्रेंडचा कॉल आला आहे, बोल! आता हे ऐकून ती बिचारी फोन हातात घेते आणि बेबी म्हणून बोलायला सुरुवात करते. गप्पांच्या नादात समोरून काही उत्तर न आल्याचे समजता ती जरा एक सेकंद थांबते जेव्हा तिच्या लक्षात येतं की हा बॉयफ्रेंड नसून तिचे बाबा आहेत. आणि मग बाबांच्या बाजूने ओरडा सुरु होतो. यानंतर ही तरुणी फक्त सॉरी पापा शिवाय काहीच बोलण्याच्या स्थितीत उरत नाही.

झोपेत बॉयफ्रेंड समजून बाबांचा कॉल..

हे ही वाचा<< Video: टॉयलेटला सुद्धा एकत्र जाणाऱ्या जुळ्या बहिणींना व्हायचंय आई; म्हणतात, “एकाच नवऱ्याकडून बाळासाठी..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून दीदी तू तो फस गयी म्हणजेच आता तुझी चांगलीच शाळा घेतली जाणार आहे असे म्हंटले आहे. आता या व्हिडिओनंतर याच दीदीने त्या मैत्रिणीची काय अवस्था केली असेल याचीही काळजी अनेकांना लागली आहे. म्हणून मित्र- मैत्रिणींनो कॉलवर बोलण्याआधी कोणी कॉल केलाय हे न चुकता बघा नाहीतर मग तुमची काय स्थिती होईल हे बघताय ना?