पावसाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. अशातच विकेंडला फिरायला जायचे प्लॅनिंग केले जातात. सर्वत्र हिरवेगार झाल्याने पावसाळ्याची मजा लुटता येते. सर्वांनाच पावसाळ्यात फिरायला जाण्याची इच्छा असते. अनेकजण तर असे आहेत की ते वर्षभरात पावसाळ्यात फिरायला जायचं म्हणून सुट्टी घेत नाहीत. अनेक जण या ऋतूचा आनंद लुटण्यासाठी सहलीचे प्लॅनही करतात. मात्र यावेळी काळजी घेणं गरजेचं आह, कारण निसर्गापुढे कुणाचंही चालत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये चक्क पर्यटक खाली उभे असतानाच महाकाय खडक कोसळला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

पर्यटक फोटो काढण्यात व्यस्थ

ब्रिटनमधील डोरसेटच्या वेस्ट बे येथे १५० फूट उंच खडकाचा एक भाग कोसळला. दरम्यान हा खडक कोसळत होता तेव्हा तिथे काही पर्यटकही उभे होते. पण सुदैवाने ते बचावले आहेत. अन्यथा ते मलब्याखाली गाडले गेले असते. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डोरसेट कौन्सिल नावाच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला असून सुरक्षेची खबरदारी म्हणून दक्षिण पश्चिम किनारपट्टीचा मार्ग तात्पुरता बंद केला आहे. समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या पर्यटकांनी कोसळणारा खडक पाहिला आणि वेळीच मागे धाव घेतली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, केशरी रंगाचा टी-शर्ट घातलेला एक माणूस  ऐतिहासिक वास्तूचे फोटो, व्हिडीओ काढत होता. त्याचवेळी खडकाचा काही भाग कोसळू लागले. सुरुवातीला छोटी दगडं पडतात आणि नंतर मात्र एक मोठा भाग वेगाने खाली कोसळतो. पर्यटकांनाही मोठ संकट येत असल्याचं लक्षात येतं आणि ते सुरक्षित ठिकाणी धावण्यास सुरुवात करतात.

ह्रदयाचे ठोके थांबवणारा VIDEO

हेही वाचा – Video: ट्रेन सुरु होताच प्रवाशांनी टीसीला शौचालयात केले बंद; सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर नेटकरीही व्हिडीओ पाहून अवाक् झाले आहेत. जुरासिक कोस्टचा गोल्डन गेटवे म्हणून ओळखला जाणारे खडक मैलांपर्यंत पसरलेले एक धोकादायक क्षेत्र आहे. ही घटना या खडकांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची आठवण करून देणारी आहे.