Train Viral Video: रेल्वे प्रवास अनेक कारणासाठी खास असतो. भोगद्यातून जाताना आरडा ओरडा करणाऱ्या मंडळींपासून ते अगदी खिडकीच्या बाजूला शांत बसून बाहेरची हिरवळ पाहणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी रेल्वे प्रवास काही खास आठवणी घेऊन येत असतो. पण तुम्ही कधी हा विचार केला आहे का की ट्रेन चालवणाऱ्या मोटरमॅनच्या डोक्यात त्यावेळी काय चालू असेल. एका ट्रेनचालकाला रात्रीच्या वेळी रेल्वेचा रूळ कसा अंगावर येताना दिसतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. इतकं की स्वतः एलॉन मस्कने सुद्धा या व्हिडिओची दखल घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हंटल तर थरारक व म्हंटल तर कमाल असा हा व्हिडीओ आहे तरी काय चला पाहुया..
ट्विटर आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे लक्ष वेधून घेणारा हा व्हिडीओ मुळात @Wow Terrifying नावाच्या ट्विटर हँडलने शेअर केला होता. या व्हिडिओला 5 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये ड्रायव्हरच्या सीटवरून ट्रेनच्या बाहेरचा भाग दिसत आहे. ट्रेन बर्फाच्छादित पट्ट्यातून मार्ग काढत जाताना हा व्हिडीओ शूट केलेला असावा . हा व्हिडिओ खऱ्या अर्थाने भीतीदायक आणि रोमांचक आहे.
Video: ट्रेन चालकाच्या नजरेतून रेल्वेचा रूळ
भडकलेली मगर अंगावर धावून येताच महिलेच्या ‘या’ एका कृतीने घडला चमत्कार; Video पाहून व्हाल थक्क
दरम्यान हा व्हिडीओ पाहून एलॉन मस्क यांनी सुद्धा मोटारमॅनच्या धाडसाचे कौतुक केले आहे. तर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी सुद्धा हा एखाद्या थ्री डी सिनेमाचा नागावर येणारा सीन वाटत असल्याचे म्हंटले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.