Viral video: विनोदी व्हिडिओ म्हणजे सोशल मीडियावरचे सर्वात जास्त चालणारे व्हिडिओ. हे व्हिडिओ सर्वाच जास्त आणि वेगात व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर प्रँकचे व्हिडिओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. एखादा विषय घेऊन त्यावर तो व्हिडिओ बनवला जातो. व्हिडिओ पाहत असताना आपल्याला वाटते, हे खरोखरच घडते आहे की काय? पण तो एक प्रँक असतो. म्हणजेच व्हिडिओतून दिशाभूल केली जाते. मात्र हे व्हिडिओ खूप विनोदी असल्याने यूझर्सना ते फार आवडतात. काही प्रँक भीतीदायक असतात. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये सिंह मागे लागला म्हणून पळणाऱ्या लोकांचा चांगलाच पचका झाला आहे. असं नेमकं काय झालं? तुम्हीच पाहा हा व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा कुत्रा आहे जो काही क्षणासाठी तुम्हाला सिंह असल्याचे भासेल. खरंतर एका झाडामागून कुत्रा पळत येतो, या कुत्र्याला पाहून दोन तरुण कंफ्युज होऊन पळून जातात. तर त्यांना पाहून आणखी दोन लोक पळू लागतात. खरंतर त्यांना पहिल्या नजरेत हा कुत्रा नसून लहान सिंह वाटतो. खरंतर या कुत्र्याचा रंग हा सिंहासारखा आहे. शिवाय कुत्र्याला सिंहा सारखा मुकुट घातला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच हवा टाईट झाली आणि सगळ्यांनी आहे त्या ठिकाणाहून धूम ठोकली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बाईकपासून तयार केला भलामोठा ट्रक; खतरनाक जुगाड पाहून सर्वांची झोप उडाली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान हा व्हिडीओ ss_king746 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत एक कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. भावा, एक मिनिट उशीर झाला असता तर तुझं काही खरं नव्हतं, तू मृत्युच्या दारातून परत आला, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर, प्रँक करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा, कधी- कधी प्रँक असे प्रँक करणे अंगलट येऊ शकतात. अशा या व्हिडिओवर गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहे