सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, एकदा का सिंहाने हल्ला केला की खुद्द यमराज देखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. जंगलातील भयानक प्राण्यांपैकी सिंह एक आहे. शिकारीच्या बाबतीत तर सिंह खूपच तत्पर आणि धोकादायक आहे. तो त्याची शिकार सहजासहजी सोडत नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात त्याच्याविषयी दहशत आहे. माणसांपासून प्राण्यापर्यंत सगळेच सिंहापासून २ हात लांब असतात. मात्र याच सिंहाला चक्क एका पिल्लाने घाबरवलं आहे. विश्वास नाही बसत ना पण हे खरंच घडले आहे.

सिंहाला दिला बछड्यानं धप्पा

एका मोठ्या दगडावर बसलेला सिंह जंगलात चिल करत बसलेला दिसत आहे. इतक्यात मागून एक छोटा सिंह हळूच त्याच्याकडे येताना दिसतो. शावकाच्या कृत्य बघून तो आपल्या वडिलांसोबत लपाछपी खेळत असल्याचा भास होतो. सिंहाला याची काहीच कल्पना नसल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘धप्पा’ देत असल्याप्रमाणे छोटं पिल्लू अचानक समोर येत सिंहाला घाबरवतं. पिल्लू त्याच्या अगदी जवळ येताच सिंह खूप घाबरतो. यादरम्यान त्याची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. सिंह दचकताना पहिल्यांदाच दिसला असेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video viral: स्विमिंग पुलमधील मजामस्ती अंगलट, काही कळण्याआधीच घडलं धक्कादायक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा पाहून तुम्हालाही हसून आवरणार नाही, अशा प्रकारे सिंहाची अवस्था पहिल्यांदाच पहायला मिळाली आहे. नेचकऱ्यांच्याही हा व्हिडीओ चांगलाच पसंतीस आला आहे.