भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे कायमच चर्चेत असतात. अनेक वृत्तवहिन्यांवर भाजपाची बाजू मांडणाऱ्या पात्रा यांचा चेहरा आज घराघरामध्ये पोहचला आहे. कधी मुद्यांवर आधारित मांडणी तर कधी मजेशीर वक्तव्यांनी वरोधकांना गप्प करण्यात पात्रांचा हातखंड आहे. मात्र हेच पात्रा मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर ट्रोल होत आहेत. यामागील कारण आहे ते त्यांना एका चर्चेदरम्यान विचारण्यात आलेला पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेसंदर्भातील एक प्रश्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संबित पात्रा हे एबीपी न्यूज या वृत्तवाहिनिने आयोजित केलेल्या ‘एबीपी शिखर संम्मेलन’मध्ये सहभागी झाले होते. १० सप्टेंबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमातील एका प्रसंगाचा व्हिडिओ आता पाच दिवसांनंतर व्हायरल झाला आहे. पात्र या कार्यक्रमात भाजपाची बाजू मांडत होते तर काँग्रेसची बाजू मांडण्याची जबाबदारी पक्षाचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी स्वीकारली होती. या चर्चेदरम्यान पात्रा यांनी भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले. ‘केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनकडे वाटलाच करत आहे,’ असं सरकारची बाजू मांडताना पात्रा यांनी सांगितलं. त्यावर वल्लभ यांनी ‘पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात तेवढं फक्त येथील उपस्थितांना सांगा,’ अशी विनंती पात्रा यांच्याकडे केली. यावर पात्रा यांनी उत्तर देण्याऐवजी थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टिका केली. ‘मला विचारण्याआधी राहुल गांधींना विचारुन या पाच ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात ते,’ असं उत्तर पात्रा यांनी दिले. यावर वल्लभ यांनी ‘सतत पाच ट्रिलियन पाच ट्रिलियन आरडाओरड करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात हे ही ठाऊक नाही. पात्राजी काही हरकत नाही पुढच्या वेळेस पाठ करुन या,’ असा टोला वल्लभ यांनी लगावला.

रांचीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अँकरने जेव्हा वल्लभ यांना, ‘ट्रिलियनमध्ये किती शून्य असतात? हे तुम्हीच सांगा’ असा सवाल केला. त्यावेळी वल्लभ यांनी केवळ ट्रिलियनवर १२ शून्य असतात असं सांगितलं. इतकचं नाही तर बिलियन, मिलियनमध्येही किती शून्य असतात हे ही वल्लभ यांनी सर्वांना सांगितले.

हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी पात्रा यांना या व्हिडिओवरुन ट्रोल केले आहे. पाहुयात नेटकरी काय म्हणतात…

शून्याशी संबंध काय

प्रश्न ऐकून अचंबित झाले

असं झालं चर्चासत्र

हे अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनवर घेऊन जाणार…

अचंबित पात्रा म्हणजे मनोरंजन

कॉमेडीमधील सुवर्णक्षण आहे हा…

मी भाजपा समर्थक असलो तरी

मी पीसीबी घेतलेलं

यांना विचारा त्यांना विचारा…

एवढे शून्य

बारा.. बारा..

तयारी चर्चासत्राला जायची

शेवट शुन्यच

चुकून झालं

यांना इतका लाख पगार आहे म्हणे

पुढच्या वेळेस

पात्रा यांना प्रश्न विचारणाऱ्या वल्लभ यांनाही व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ट्विट करुन पुन्हा पात्रा यांनी फिरकी घेतल्याचे पहायला मिळाले.

…आणि तुम्ही मनमोहन सिंग यांच्यावर टीका करणार

‘पाच ट्रिलियनमध्ये शून्य किती हे ठाऊक नसणाऱ्या पात्रा यांनी केवळ ऊई… ऊई आणि पुई पुई पर्यंत मर्यादीत रहावे. त्यांनी अर्थव्यवस्था आणि मनमोहन सिंग यांच्यावर टीका करण्याच्या भानगडीत पडू नये. मनमोहन सिंग यांच्या नखं ही पात्रा यांच्या मेंदूपेक्षा जास्त शिकलेली आहेत,’ अशी टीका काँग्रेसच्या निरज भाटीया यांनी या प्रकरणावरुन केली आहे.

दरम्यान, या व्हायरल व्हिडिओमुळे शनिवारी Sambit Patra हा टॉपिक ट्विटवरील ट्रेण्डींग टॉपिक होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video when sambit patra asked to tell number of zeros in a trillion scsg
First published on: 16-09-2019 at 12:54 IST