Girls Fall Down The Road Video: पावसाळ्यात घाट रस्त्यातून प्रवास काढताना अचानक आपल्याला एखादी दरी इतकी सुंदर दिसते की तिथे गाडी थांबवून फोटो काढण्याचा मोह आवरतच नाही. अलीकडे तर रील्सचं वेड ही इतकं वाढलंय की या वेड्या प्रेमात वेडी झालेली लोकं भररस्त्यात डान्स करण्यासाठी सुद्धा गाडी थांबवून ट्रॅफिक अडवायला मागे पुढे पाहात नाहीत. पण अशा एखाद्या वळणाच्या रस्त्यावर गाडी कडेला उभं करणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी सुद्धा खेळ करण्यासारखं आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ पाहाच.

नेमक्या कोणत्या कारणासाठी या तरुणींनी रस्त्याच्या कडेला गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला माहित नाही पण हा एक चुकीचा निर्णय त्यांना चांगलाच अंगलट आला आहे. तुम्ही बघू शकता की स्कुटीवरून प्रवास करत असणाऱ्या तिघी जणी एका रस्त्याच्या शेजारी स्कुटी थांबवतात. व्हिडिओमध्ये बघून तर हा चढणीचा रस्ता वाटत आहे. त्यामुळे मुळातच इथे गाडी थांबवणे म्हणजे कॉमन सेन्सचा अभाव म्हणता येईल. त्यात या तरुणी ट्रिपल सीट जात होत्या. गाडी थांबवताना त्यांच्यातील विश्वासू ड्रायव्हरचं संतुलन गेलं आणि मग जे झालं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Video: पापा की परीने गाठली दरी

हे ही वाचा<< ‘लप्पु सा सचिन’ म्हणणाऱ्या महिलेचा पती पहिल्यांदा कॅमेरासमोर? Video पाहून लोकं म्हणतात, “सीमाला तर… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलेलं नाही. पण व्हिडिओच्या कॅप्शनवरून तरी मुली रस्त्याच्या कडेवरून कोसळून शेजारच्या झुडुपात अडकून पडल्या असणार असे वाटत आहे. अशाप्रकारे जीवाशी खेळ करणारे प्रकार आपणही टाळायलाच हवेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी या तरुणींवर टीका केली आहे. पापा की परीने गाठली दरी अशा कमेंटही या व्हिडिओवर पाहायला मिळतायत. इथे या तरुणी थोडक्यात बचावल्या असल्या तरी असा नाहक स्टंट जीवावर बेतू शकतो.