Viral Video: नातं कुठलंही असो; पण त्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. परंतु, अनेक जण रागात समोरच्या व्यक्तीवर हात उचलतात, ज्यामुळे नातं अधिक कमकुवत होतं. सोशल मीडियावर कधी पालकांनी मुलांना मारहाण केल्याचे किंवा पती-पत्नीमधील मारहाणीचे व्हिडीओ तुम्ही अनेकदा पाहिले असतील. पण, आता समोर आलेल्या व्हिडीओतील एक पत्नी तिच्या पतीला माराहाण करताना दिसत आहे.

हल्लीचा बदलणारा काळ बघता प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत. त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही. अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये त्यांचं प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो. पण, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका जोडपं भररस्त्यात मारामारी करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पती-पत्नी बाईकवरून जात असून यावेळी यांच्यामध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण झाल्याचे दिसत आहे. परंतु यावेळी पत्नी पतीला मारहाण करायला सुरुवात करते. यावेळी ती पतीच्या डोक्यात, पाठीत, कंबरेत बुक्क्या मारते. परंतु यावेळी पती गुपचूप ती करत असलेली मारहाण सहन करतो.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @majhi_rambha या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत जवळपास अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्सही करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “रोड वरच ऐवढे मारत आहे, घरी गेल्यांवर लाताच घालणार”. दुसऱ्या व्यक्तीनं लिहिलंय, “म्हातारी लय डेंजर हाय”. तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “ही बाई तर जास्त डेंजर आहे ”.