Women Beaten In Video On Camera: उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त संदेशखाली भागातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एका महिलेला पत्रकारांसमोर मारहाण केल्याचे दिसते.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर LonerMonkey ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral
several injured in multiple stabbing-shooting incident
सिडनीतल्या मॉलमध्ये चाकू हल्ला, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक जखमी; संशियाताला पोलिसांनी ठार केल्याचं वृत्त
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
pilots missing What happened to Vistara
३८ हून अधिक उड्डाणे रद्द, तासभराचा उशीर, वैमानिक गायब; ‘विस्तारा’चं काय बिनसलं?

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडिओवरून मिळालेल्या स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. रिव्हर्स इमेज सर्चद्वारे शोध घेतल्यावर आम्हाला X वापरकर्ता Keya Ghosh यांनी २०१८ साली केलेली एक पोस्ट सापडली.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिला निलिमा डे सरकार असल्याचे पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आम्ही कॅप्शनमध्ये दिलेल्या शब्दांवर गूगल सर्च केले. त्यानंतर आम्हाला याबद्दल विविध बातम्या आढळल्या.

https://www.ndtv.com/kolkata-news/caught-on-camera-trinamool-leaders-attacks-on-woman-bjp-supporter-1924725

हि बातमी १ ऑक्टोबर, २०१८ रोजी प्रकाशित झाली होती. आम्हाला या घटनेबद्दल अधिक बातम्यांचे अहवाल देखील आढळले. पश्चिम बंगालमधील बारासातमध्ये ही घटना घडल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

https://www.hindustantimes.com/india-news/bjp-woman-supporter-attacked-and-thrown-to-the-ground-she-blames-trinamool-congress/story-OzCOJrKENunMCtMHdXYTvM.html

एनडीटीव्हीच्या यूट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

हे ही वाचा<< वडापावला कचरा म्हणत मुंबईची इन्फ्लुएन्सर साक्षीचं भाषण.. एक एक शब्द ऐकून मुंबईकर भडकले, पाहा Video

निष्कर्षः कॅमेऱ्यात महिलेला मारहाण झाल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ संदेशखाली येथे घडलेल्या अलीकडील घटनेचा नाही. भाजप समर्थकावर टीएमसी नेत्याने हल्ला केल्याचा २०१८ चा जुना व्हिडिओ, खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.