Viral Video : महाराष्ट्राची संस्कृती ही जगावेगळी आहे. महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये विविध गोष्टी, परंपरा पाहायला मिळतात. काही परंपरा थक्क करणाऱ्या असतात. अशीच एक परंपरा म्हणजे भावकी. भावकी ही हल्ली गावाकडेच पाहायला मिळते. तुम्हाला माहीत आहे का, भावकीची परंपरा. घरात कोणतेही कार्य असू द्या, जी मदतीला धावून येते ती म्हणजे भावकी.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या तरुणाने भावकी आणि गावाकडच्या या खास परंपरेविषयी सांगितले आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हिडीओमध्ये तरुण सांगतो, “आमच्या घरी एका कार्यक्रमाच्या निमित्त्याने भावकीतल्या सर्व बायका स्वयंपाक करायला आल्या होत्या. कोणी चूल पेटवत होतं, कोणी चपाती लाटत होतं, कोणी चपाती भाजत होतं, कोणी बटाट्याच्या साली काढत होतं तर कुणी धुणी धुवत होतं. घरात कोणतेही कार्य असू द्या, सर्वात पहिले मदतीला भावकीच धावून येते. गावागावात मदतीचा भावकीचे संस्कार अजुनही टिकून आहे. भावकीचं काम म्हटलं की सर्व मिळून हातभार लावून कार्य पार पाडत असतात. मिळून मिसळून काम करण्यात एक वेगळाच आनंद असतो. असा आनंद घेणारी ही कदाचित शेवटची पिढी असेल.” हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. काही लोकांना व्हिडीओ पाहून गावाकडची आठवण येईल. तर काही लोकांना त्यांच्या भावकीत्या महिला आठवतील. ही संस्कृती फक्त आता गावाकडेच पाहायला मिळते.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गुंडांचा हैदोस; भररस्त्यात कपडे काढून दारुनं अंघोळ घातली, तेवढ्यात पोलिसांची एन्ट्री अन्…

garad.vishal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “भावकी ” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंच ही शेवटची पिढी आहे” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्या गावात अजून पण ही परंपरा चालू आहे, यामधून खूप आनंद मिळतो” आणखी एका युजरने लिहिलेय, “आमची भावकी आमचा अभिमान, एकाचा कार्यक्रम सर्वांचा हातभार”