आपण अनेकदा लायब्ररीमधून पुस्तकं आणतो, ही पुस्तकं एक-दोन आठवडयांनी किंवा दिलेल्या कालावधीमध्ये आपण परत करतो. ही अगदी साधी वाटणारी गोष्ट आहे, पण याचाच एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका व्यक्तीने तब्बल ८४ वर्षांपुर्वी लायब्ररीमधून घेतलेले पुस्तक परत केले आहे. हे वाचून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, नेमके काय घडले जाणून घ्या.

कॅप्टन विलीयम हॅरीसन यांनी एका लायब्ररीमधून ‘रेड डिअर’ हे पुस्तक घेतले होते, जे ११ ऑक्टोबर १९३८ पर्यंत परत करायचे होते. पण ते पुस्तक परत करण्याचे विसरले. १९५७ साली त्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कपाटात ते पुस्तक तसेच राहिले. काही दिवसांपुर्वी त्यांचा नातू पॅडी रीओर्डन यांना हे पुस्तक सापडले आणि त्यांनी ते लायब्ररीला परत करण्याचे ठरवले. पुस्तकासह £१८.२७ इतकी रक्कमही उशीरा पुस्तक दिल्याबद्दल त्यांनी लायब्ररीला दिली. लायब्ररीकडून या घटनेचे शेअर करण्यात आलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. पाहा व्हायरल होणारे फोटो.

Video : “मला वेडी बोलली?”, ओवाळणीच्या गाण्यावरून चिमुकलीचा निरागस प्रश्न होतोय Viral

व्हायरल फोटो :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल फोटोने नेटकऱ्यांचे मन जिंकले असून. ‘पुस्तकं म्हणजे खरे वैभव आहे आणि त्याची किंमत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.