Viral Video : सोशल मीडियावर रस्त्यावर लावलेल्या पाट्या, घरा किंवा कार्यालयाबाहेर लावलेले सुचना फलक, वाहनांच्या मागे लिहिलेले स्लोगन चांगलेच व्हायरल होत असतात. काही पाट्या मजेशीर असतात तर काही पाट्या थक्क करणाऱ्या असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रकमागे सुंदर संदेश लिहिलेला दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तुम्ही ट्रकच्या मागे लिहिलेले अनेक संदेश आजवर वाचले असेल. ‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके, हॉर्न प्लीज हे संदेश तर प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेले असकतात. पण काही लोक मजेशीर मेसेज सुद्धा लिहितात. शेरोशायरी लिहितात, म्हणी लिहितात तर कधी कधी भावनिक संदेश सुद्धा लिहितात. या व्हायरल व्हिडीओमध्ये या ट्रकचालकाने त्याच्या ट्रकच्या मागे असे काही लिहिलेय की प्रत्येक मुंबईकराला ते आवडेल. कदाचित हा ड्रायव्हर सुद्धा एक मुंबईकरच असावा. त्याने त्याच्या ट्रकच्या मागे लिहिलेय, “ये नीम का पेड चंदन से कम नही, हमारा नवी मुंबई लंदन से कम नही” म्हणजेच कडूलिंबाचे झाड चंदन पेक्षा कमी नाही, आपली नवी मुंबई लंडनपेक्षा कमी नाही” ही पाटी पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

bestofnavimumbai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “ग्रीन शहर, स्वच्छ शहर नवी मुंबईकर असल्याचा अभिमान आहे” तर एका युजरने लिहिलेय, “नवी मुंबईकर असल्याचा अभिमान आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “मुंबई आणि नवी मुंबई महाराष्ट्रात आहे. सगळं मराठीत पाहिजे.” एक युजर लिहितो, “खरंच नवी मुंबई खूप सुंदर आहे” तर एक युजर लिहितो, “राहण्यासाठी नवी मुंबई सर्वोत्तम जागा आहे” अनेक युजर्सनी नव्या मुंबईचे कौतुक केले आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत तर काही युजर्सनी नव्या मुंबईविषयी प्रेम व्यक्त केले आहेत.