Viral Photo Shows Company Gifts SUVs To 25 Employees : कंपनी उभारण्यात जेवढी मालकाची मेहनत असते तितकीचं मेहनत त्या कंपनीला पुढे नेण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याची धडपस सुरु असते. त्यामुळे अनेकदा कंपनीच्या वाढदिवसानिमित्त मालक कर्मचाऱ्यांचेही कौतुक करतात. संपूर्ण कंपनीसाठी पार्टी ठेवून त्यांना भेटवस्तू देतात, केक कापतात, बोनस किंवा पगारवाढ सुद्धा करतात. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होतो आहे; यामध्ये चक्क मालकाने कर्मचाऱ्यांना पार्टी किंवा पगारवाढ न करता मोठे गिफ्ट दिले आहे.

चेन्नईतील डेटा आणि लाईफ सायन्सेस स्टार्टअप अ‍ॅजिलिसियमने @Agilisium Consulting या टेक कंपनीला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. तर यानिमित्त सगळ्यांनी मिळून फक्त केक कापला नाही तर कर्मचाऱ्यांना नवीन एसयूव्ही घेऊन दिल्या आहेत. पण, कंपनीने सर्वात जास्त वेळ कंपनीत राहणाऱ्या म्हणजेच कंपनी सुरु झाल्यापासून आतापर्यंत काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना ह्युंदाई क्रेटा एसयूव्ही भेट दिल्या आहेत आणि कर्मचाऱ्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे.

तर चेन्नईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील अ‍ॅजिलिसियमच्या टेक कंपनीचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी ५०० हून अधिक कर्मचारी जमले होते. तुम्ही फोटोत पाहू शकता २५ गाड्या अगदी लाईनमध्ये लावलेल्या दिसत आहेत. फक्त कर्मचारीच नाही तर त्यांचे कुटुंबातील सदस्य सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. पण, या कार्यक्रमात भेटवस्तू देण्याचे काम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आले होते. जेव्हा २५ नवीन एसयूव्ही आणि त्यांच्या नंबर प्लेटवर संबंधित कर्मचाऱ्याचे नाव लिहिली तेव्हा मात्र कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला.

पोस्ट पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा

https://www.linkedin.com/posts/agilisium_we-enthusiastically-launched-our-10th-anniversary-activity-7338969023855869955-8AwV?utm_source=social_share_send&utm_medium=android_app&rcm=ACoAAFNu-gkBpMfOPPTVsQkC7MVaOpX2OvfjeJ0&utm_campaign=copy_link

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर ही पोस्ट @linkedin @Agilisium Consulting या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी लिहिले की, “आमची यशोगाथा तुमच्या प्रत्येकाची आहे. तुमच्या वचनबद्धतेशिवाय आम्ही येथे पोहोचू शकलो नसतो. त्यामुळे कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पहिल्या दिवसापासून आमच्याबरोबर उभे राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही एसयूव्ही कार भेट म्हणून देत आहोत”; अशी कॅप्शन आणि २५ कर्मचाऱ्यांची नाव सुद्धा पोस्टच्या कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आली आहेत…