Viral Photo Shows Eagle Snatches Hall Ticket : परीक्षा द्यायला जाताना पेन, पेन्सिल, पॅड आणि अगदी हॉलतिकीट तर जवळ ठेवलेच पाहिजे. महत्त्वाच्या परीक्षांना हॉलतिकीट दाखवल्याशिवाय बसता किंवा अगदी प्रवेशसुद्धा देत नाहीत, त्यामुळे चुकून जरी हॉलतिकीट राहिले, हरवले की आपल्याला घाम फुटल्याशिवाय राहत नाही; तर आज सोशल मीडियावर असेच काहीसे घडले आहे.

गुरुवारी सकाळी सरकारी यूपी शाळेत (Government UP School) ही घटना घडली, जिथे अनेक विद्यार्थी केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी रांगेत उभे होते. त्यापैकी एक विद्यार्थी शेवटच्या क्षणी उजळणी करण्यात व्यस्त होता. सकाळी ७:३० वाजता परीक्षा सुरू होणार होती. परीक्षा सुरू होण्याच्या काही वेळ आधी गरुड त्याचे हॉलतिकीट हिसकावून घेऊन गेला. हॉलतिकीट घेऊन गरुड शाळेच्या वरच्या मजल्यावरील खिडकीवर शांतपणे बसलेला दिसला. पण, त्या विद्यार्थ्याला हॉलतिकीट परत मिळाले का हे व्हायरल पोस्टमधून तुम्हीसुद्धा बघा…

पोस्ट नक्की बघा

गरुड मागील आयुष्यात पर्यवेक्षक होता (Viral Video)

तर पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे शाळेमध्ये प्रचंड गर्दी होती. अनेक विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी हजर राहिले होते. यादरम्यान एका विद्यार्थ्याचे गरुडाने हॉलतिकीट हिसकावून घेतले आणि तो खिडकीवर बसून राहिला. पण, गरुड काही मिनिटे तिकीट धरून तसाच बसून राहिला आणि अखेर त्याने ते हॉलतिकीट योग्य मालकाच्या हातात जाऊनसुद्धा दिले, ज्यामुळे योग्य वेळी तो वेळेवर परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करू शकला.

दरम्यान, या व्हिडीओने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे, कमेंट सेक्शनमध्ये अनेक युजर्स ‘गरुड मागील आयुष्यात पर्यवेक्षक होता’, ‘मिस्टर गरुडलासुद्धा परीक्षा द्यायची इच्छा असेल’, ‘जेव्हा देवाचा काही वेगळाच प्लॅन असतो’; अशा मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरुड हा शिकारी म्हणून ओळखला जातो. गरुड लहान शिकार करत नाही तर मोठ्यामोठ्या प्राण्यांवर हल्ला करतो. अगदी माणसांकडूनही अन्न चोरण्यासाठी तो मागे पुढे बघत नाही. वेगाने त्याला हवे ते हिसकावून घेतो. तर आज चक्क त्याने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे हॉलतिकीतच हिसकावून घेतले आहे.