Viral Post Shows Honest Auto Driver Story : एखाद्या व्यक्तीमध्ये संस्कार असतील तर त्याच्यात तुम्हाला प्रामाणिकपणा हा दिसेलच. अनेकदा ट्रेन, टॅक्सी, ओला, उबर किंवा अगदी रिक्षामध्ये सुद्धा आपण बॅग, पर्स किंवा एखादी मौल्यवान वस्तू विसरतो. मग ही वस्तू परत मिळवण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागतात. कारण आपल्याकडे त्या वाहनाचा नंबर किंवा कोणतीच माहिती नसते. त्यामुळे अशावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याएवजी आपल्याकडे कुठलाही पर्याय नसतो. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखे पाहायला मिळाले आहे.
तर व्हायरल पोस्ट नुसार हा प्रसंग एका तरुणीबरोबर घडला आहे ; जो तिने @reddit वर शेअर केला आहे. तरुणी जवळपास ३ वर्षांपासून बंगळुरूमध्ये राहते. तर तिने अचानक सोलो डेटवर (सोलो डेट दरम्यान, लोक एकटे बाहेर जातात) जाण्याचे ठरवले आणि त्यासाठी एका ऑटो रिक्षातून प्रवास करत होती. तिने बंगळुरूमध्ये मेट्रोने चर्च स्ट्रीटवर उतरून जेवली. गो-कार्टिंग करायला गेली. नंतर इंदिरानगरमध्ये कॉफी पिऊन दिवसाचा शेवट केला. यादरम्यान ती खूप मैल्यवान वस्तू रिक्षात विसरली आहे याची तिला जाणीवच नव्हती.
नशीब चांगलं होतं म्हणून… (Viral Post)
तरुणी कॅफेमध्ये कॉफी पीत असताना अचानक रिक्षा चालक तिथे येतो आणि तरुणीच्या हातात चाव्यांचा बंडल देतो; ज्यामध्ये गाडी, घर आणि लॉकरच्या चाव्या असतात. त्यामुळे तरुणीला जाणीव झाली की, ती रिक्षात चाव्यांचा बंडल विसरून आली होती. पण, रिक्षा चालकाने जेव्हा हे पहिले तो ट्रॅफिक पार करून पुन्हा कॅफेजवळ आला. रिक्षा चालकाने केलेली मदत पाहून तरुणी भारावून गेली आणि तिने त्यांना पैसे देऊ केले. पण, रिक्षा चालकाने ते पैसे स्विकारले नाही. तेव्हा तरुणीने ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले.
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट या @reddit अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच “रिक्षा चालकाला मारहाण करणाऱ्या आणि बंगळुरू बाहेरील लोकांशी किती कठोर वागतात याबद्दलच्या अनेक पोस्ट व्हायरल होत असताना, ही खास गोष्ट शेअर करण्याची इच्छा झाली. लवकरच शहर सोडणार आहे, नक्कीच बंगळुरूची आठवण येईल’ ; अशी कॅप्शन पोस्टला देण्यात आली आहे. पोस्ट व्हायरल होताच अनेकांनी तरुणीला ‘लकी गर्ल’ म्हंटले आहे. कारण – अनेक रिक्षा चालक त्यांच्याकडे वस्तू असूनही मुद्दाम प्रवाशांना खोट सांगताना दिसतात.