Mumbai Auto Rickshaw Driver Viral Post : रिक्षा चालक आणि प्रवासी यांच्यातील बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये अनेकदा रिक्षा चालक अनोळखी प्रवाशांना त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत असतात. तर कधी प्रवासी सुद्धा त्यांच्या घरदार, नोकरीबद्दल चर्चा करताना दिसतात. तर आज अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे; यामध्ये चक्क रिक्षा चालकाने रस्त्यात रिक्षा थांबवून त्याच्या प्रवासी महिलेच्या आवडी-निवडी बाबत प्रश्न उपस्थित केले आहेत; जे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
मुंबईत जाहिरातींमध्ये काम करणाऱ्या अदिती गणवीरची अलिकडेच एका विचित्र रिक्षा चालकाशी भेट झाली. ऑफिसला पोहचण्या अगोदरच चालकाने रिक्षा रस्त्यातच थांबवली आणि तिच्या आयुष्याच्या निवडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सगळ्यात पहिला ऑफिसला पोहचण्यापूर्वी १ किलोमीटर आधीच रिक्षा चालक थांबला आणि पुढे जाण्यास नकार दिला आणि ही राईड स्वीकारल्याबद्दल पश्चात्तापही व्यक्त केला. एवढेच नाही तर ‘तू इतक्या लांबची नोकरी का स्विकारलीस’ असेही आवर्जून विचारले.
तुझे गाव, शहर सोडून तू मुंबईत का आलास?
तरुणीच्या ऑफिसला पोहचण्याचे एकूण अंतर १९ किलोमीटर होते. पण, रिक्षा चालकासाठी हे अंतर खूपच दूर होते. म्हणून रिक्षा चालकाने १८ किलोमीटर चालवल्यानंतर प्रवासी महिलेला मध्येच उतरवले. त्यानंतर रिक्षा चालकाने तिचा पगार मोजायला सुरुवात केली आणि ही राईड स्वीकारायला नको होती ‘मी एवढ्या लांब नाही जाऊ शकतं’ असेही म्हंटले. हा सर्व प्रसंग पाहून अदितीने “कधीकधी, तुमचा प्रवास इतरांसाठी गैरसोयीचा असेल आणि त्यामुळे तुम्हाला ते मध्येच सोडून जातील. पण, ठीक आहे. त्यांना फक्त १ स्टार रेट करा आणि पुढे जा” ; अशी linkedin वर पोस्ट शेअर केली आहे.
पोस्ट नक्की बघा…

सोशल मीडियावर ही पोस्ट अदितीने linkedin अपवरून @Aditi Ganvir या अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. नेटकरी ही पोस्ट पाहून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत “ती ग्राहक होती म्हणून. स्वतःची मुलगी, पत्नी, बहीण असती तर त्याने १ किमी आधी सोडले असते का”, “त्यालाही तोच प्रश्न विचार तुझे गाव, शहर सोडून तू मुंबईत का आलास?”, “तुमचा अहवाल अपूर्ण आहे. शहर कोणते आहे? ड्रायव्हरचे नाव सांगणे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत” ; आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.