viral video: धावत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; चिमुकल्यानं घेतला स्टेअरिंगचा ताबा अन्…

Video viral : 3 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याच्या इतर मित्रांचे प्राण वाचले आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल/

school bus driver heart attack
चालकाला आला हृदयविकाराचा झटका (Photo: twitter)

रस्ते अपघात कुठेही आणि केव्हाही होऊ शकतात. कधी कोणावर कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वाहन चालवताना चालकांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत. अशाच एका घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एका चिमुकल्यानं दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

१३ वर्षाच्या मुलाने दाखवलं प्रसंगावधान –

या धक्कादायक व्हिडीओमध्ये 13 वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्याच्या इतर मित्रांचे प्राण वाचले आहेत. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होतो आहे.ग्रेट व्हिडीओ नावाच्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो स्कूल बस ड्रायव्हरला हृदयविकाराचा झटका आला आणि बसवरील त्याचा ताबा सुटला. या दरम्यान एका १३ वर्षीय धाडसी विद्यार्थ्याने कसलाही विचार न करता बसचे स्टेअरिंग हाती घेतले आणि बस मधल्या इतर विद्यार्थ्यांचेदेखील प्राण वाचवले.यावेळी सर्व मुले घाबरतात पण स्टेअरिंग चालवणारा मुलगा शांत बस चालवतो.मग तो स्टेअरिंगवरून हात काढून ड्रायव्हरची छाती दाबू लागतो.तेवढ्यात दुसरा मुलगा जवळ येतो आणि बस थांबवतो. ही संपूर्ण घटना बसमध्ये लावलेल्या कॅमेरात कैद झाली होती.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – अशीही कृतज्ञता ! डॉक्टरांनी केलेल्या मदतीसाठी पेशंटकडून अनोखं थँक्यू, पाहून तुम्हीही म्हणाल…

या व्हिडीओला ९५ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्या मुलाचे अनेकांनी कौतुक केले आहे. सोशल मीडियावरच्या युजर्सनी त्याच्या पालकांना त्याचा अभिमान वाटत असेल असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने, हा मुलगा खरा हिरो आहे, त्याने पहिल्यांदा परिस्थिती पाहिली आणि न घाबरता प्रतिक्रिया दिली, असे म्हटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 17:21 IST
Next Story
बाप तो बापच! मुलाशी वाद झाल्यानंतर वडिलांनी WhatsApp ला ठेवला जबरदस्त स्टेटस, वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Exit mobile version