Viral Shocking Video: तुम्ही कोणत्याही कुत्र्याच्या मालकाला विचारा की ‘तुमचा हा चार पायाचा व शेपूटवाला मित्र’ नेमकं काय करू शकतो? आणि बस पुढचे काही तास तुम्ही भरपूर गप्पा मारू शकता. चिंकी, पिंकी, डॉली अगदी ऑस्कर वगैरे नाव असणारे हे प्राणी चहाचा कप उचलून ठेवण्यापासून ते घरातील मालकाचं मनोरंजन करेपर्यंत एकूण एक काम तत्परतेने करतात. एखाद्या वेळेस जर यांचा मालक आजारी असेल किंवा तणावात असेल तर हेच पाळीव प्राणी आपल्या मित्राप्रमाणे साथ देतात. अशा बहुपयोगी प्राण्यांचे व्हिडीओ तुम्हीही सोशल मीडियावर पाहत असाल. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

hugo_the_shark या अकाऊंटवरून एका पाळीव कुत्रीच्या मालकिणीने एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिने आपल्या या देखण्या मैत्रिणीचा उल्लेख ‘स्मार्ट व्हॅक्यूम’ म्हणून केला आहे. इतकं विचित्र नाव का असा प्रश्न तुम्हालाही पडलं असेल ना? पण हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला सुद्धा हे नाव अगदी १००% बरोबर आहे हे समजेल. व्हिडिओसोबत “माझ्या रुंबाला असे वाटते ती सगळं काही करू शकते” असे कॅप्शन देण्यात आले आहे. (Video: रडणाऱ्या पर्यटकाला Kiss करून माकडाने दाखवली माणुसकी; पाहून तुमचेही डोळे पाणवतील)

आपण पाहू शकता की व्हिडिओच्या सुरुवातीला या व्हॅक्युम क्लिनरची मालकीण “मला मिळालेला हा नवीन स्मार्ट व्हॅक्यूम मला तुम्हाला दाखवायचा आहे. “समजा जर मी जमिनीवर काही टाकले किंवा चुकून पडले तरी क्षणात माझा हा शेपूटवाला स्मार्ट व्हॅक्युम क्लिनर जमीन स्वच्छ करून टाकतो” असे म्हणते. ” एवढं बोलून काही वेळातच ती बिस्किटाचा तुकडा जमिनीवर टाकते आणि काही क्षणातच तिची सुंदर कुत्री समोर बाजूच्या खोलीतून ते खाण्यासाठी आत येते.

पाहा व्हिडीओ

(Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी शेअर केल्यापासून या व्हिडिओला जवळपास ६. ३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओवरअनेकांनी केलेल्या कमेंट्स सुद्धा मजेशीर आहेत. काहींनी आपल्याकडेही असे २ व्हॅक्युम क्लिनर आहेत असे म्हणत इतरांनी सुद्धा असे स्मार्ट क्लिनर घ्यावेत अशी शिफारस केली आहे.