Viral Video: आजकालची नवीन पिढी काही गोष्टी मनासारख्या झाल्या नाही की, लगेच चिडचिड करतात, नाराज होतात, स्वतःला त्रास करून घेतात. कधी मनासारखी नोकरी किंवा कॉलेज न मिळणे, आवडीच्या व्यक्तीकडून प्रेमात धोका किंवा नकार मिळणे अशा विविध गोष्टी असतात. परंतु, या सर्व गोष्टी आयुष्याचा भाग आहेत, त्या विसरून जाणं सहज शक्य नसलं तरीही अशक्य अजिबात नाही. त्यासाठी स्वतःच्या पालकांचा विचार न करता, अनेक जण आत्महत्येचा पर्याय निवडतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील विद्यार्थिनी हेच करताना दिसतेय.
आयुष्यातील संकटांना समोरे जाण्याऐवजी आत्महत्या करून आपले लाखमोलाचे आयुष्य उद्धवस्त करणे ही खूप चुकीची गोष्ट आहे. हल्लीच्या तरुणाईमध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. सोशल मीडियावर शाळा, कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे अनेक व्हिडीओ वारंवार व्हायरल होत असतात. आतादेखील असाच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ अहमदाबादमधील एका शाळेचा आहे. या शाळेतील दहावीची एक विद्यार्थिनी आत्महत्या करताना दिसतेय. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ही विद्यार्थिनी चौथ्या मजल्यावरील वर्गाबाहेरच्या आवारात फिरते आहे आणि अचानक ती तेथील लोखंडी रेलिंगवरून खाली उडी मारते.
पाहा व्हिडीओ:
ही विद्यार्थिनी १५ वर्षांची असून, ती दहावी इयत्तेत शिकत होती. उडी मारल्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या व्हिडीओ X वरील @Deepikasingh043 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत हजारो व्ह्युज मिळाले आहेत. त्याशिवाय अनेक युजर्स यावर कमेंट्स करत आहेत.