Viral Video: शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं, शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणीत घर करुन राहतात. या जगात असा एकही व्यक्ती नसेल ज्याच्या शाळेशी जोडलेल्या काही आठवणी नसतील. शाळेतल्या गोड गमती जमती आणि मित्र मैत्रीणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी नेहमीच आपल्या स्मरणात असतात. सध्या एका शाळेतील असाच एक सुंदर व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही तुमच्या शाळेचे दिवस आठवतील.
सोशल मीडियावर आपण अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. आता असाच एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात वर्गातील विद्यार्थी एका गाण्यावर नाचताना दिसत आहेत.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
हा व्हिडीओ एका गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असून या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शाळेतील वर्गामध्ये काही विद्यार्थी “चिमणा चिमणीचे लगीन”, या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी प्रत्येकजण जमेल तसा डान्स करत असून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुंदर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. सध्या त्यांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओवर आतापर्यंत तीन लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, यावर दहा हजाराहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत.
हेही वाचा: ‘आता आमची जिरली…’, पावसाला वैतागून गावकऱ्यांनी लावला थेट बॅनर; PHOTO पाहून हसाल पोट धरून
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
या एका युजरने लिहिलंय की, “अशा पद्धतीने शिकवणी केली तर मुलांची शाळेत यायची ओढ आणि उत्सुकता आपोआप वाढेल सर, गुड जॉब”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “त्या मुलांचं भाग्य आहे सर तुमच्यासारखे सर मिळाले”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “या शिकवण्याच्या संकल्पनेला माझा सलाम..मुलांच्यात चांगल्या प्रमाणात प्रगती होईल”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “शिक्षकांना बालपण जास्त जगता येतं”
