Viral Video: आजकालची लहान मुलं खूप अॅडव्हान्स आहेत, त्यांना लहान वयातच त्यांच्या आवडीच्या गोष्टी कळतात, आवडते छंद कोणते याची जाणीव होते. काहींना गाणं गायला आवडतं, तर काहींना अभिनय करायला आवडतो, तसेच बऱ्याच जणांना डान्स करायला आवडतो. त्यामुळे ते त्यांच्या आवडीचे छंद नेहमीच जोपासतात. सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून ते आपली कला सादर करतात. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक लहान चिमुकला भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. पण, अनेकदा जुन्या चित्रपटांतील गाणीदेखील सोशल मीडियावर खूप चर्चेत येतात; ज्यावर लाखो लोक रील्स बनवतात. सध्या एका तमीळ चित्रपटातील ‘ओटागाठाई कट्टीको’ हे एक गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, त्यावर अनेक जण रील्स बनविताना दिसत आहेत. या गाण्यावर एका परदेशी चिमुकल्याचा डान्सदेखील आता तुफान व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील त्याचं कौतुक कराल.
व्हिडीओमध्ये नक्की काय घडलं?
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला तमीळ चित्रपटातील चर्चेत असलेल्या ‘ओटागाठाई कट्टीको’ गाण्यावर डान्स करीत आहे. हा चिमुकला परदेशातील असून, या गाण्यावर तो सुंदर स्टेप्स करताना दिसत आहे. त्याशिवाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील एक्स्प्रेशन्सदेखील पाहण्यासारखे होते. या चिमुकल्याचा हा डान्स सध्या खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @feminaindia या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्युज आणि एक हजारहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: ‘बरसो रे मेघा मेघा…’ पाऊस पडताच श्वानाने केला हटके डान्स; VIDEO पाहून येईल हसू
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “यालादेखील भारतीय गाणी आवडतात वाटतं.” दुसऱ्या युजरने चिमुकल्याचे कौतुक केले आहे. तर तिसऱ्या युजरने, “खूप आकर्षक डान्स”, अशी कमेंट केली आहे. चौथ्या युजरने, “हा किती गोड आहे. खूप छान.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अनेक लहान मुलांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते; जे पाहून युजर्सही त्यांचे खूप कौतुक करताना दिसले होते.