Viral Video: जंगलात असो किंवा माणसांच्या आयुष्यात असो; अनेकदा एकट्या व्यक्तीला पाहिल्यावर लोक नेहमीच त्याच्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन आपला डाव साधतात. जंगलातील प्राणीदेखील एकट्या प्राण्यावर नेहमी हल्ला करण्यासाठी पुढे येतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ खूप चर्चेत असून, नेटकरीही यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर अनेकदा विविध प्राण्यांचे व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात; ज्यातील बरेच व्हिडीओ जंगलातील प्राण्यांचे असतात. जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओ म्हटल्यावर युजर्सही ते आवडीने पाहतात. कारण- त्यातील अनेक गोष्टी आपल्यासाठी कधीही न पाहिलेल्या किंवा अधिक माहिती मिळवून देणारे असतात. दरम्यान, आता एक थरराक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. त्यामध्ये असं काही पाहायला मिळत आहे, जे पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये सिंहांचा एक कळप एकट्या जिराफाला पाहून शिकार करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जातो. यावेळी ते सगळे मिळून जिराफावर हल्ला करतात. त्या बिचाऱ्या एकट्याचे सिंहांच्या कळपापुढे काहीच चालत नाही. सगळे जण मिळून जिराफाला खाली पाडतात आणि त्याच्या शरीराचे लचके तोडतात. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @Latest Sightings या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओखाली एका युजरने लिहिलंय की, “त्याला मृत्यू निश्चित होता” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “खूप दुःख वाटलं हे पाहून.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मला माहीत आहे की, हा निसर्गाचा नियम आहे; पण ते पाहून मला वाईट वाटले.” आणखी एकाने लिहिलेय, “बिचारे जिराफ काहीच करू शकले नाही.”