लहान मुलं खूपच खोडकर असतात. परंतु काहीवेळा ते नकळतच अशी एखादी खोडी करतात, जी मोठ्यांना चांगलीच महागात पडते. यामुळे अनेकदा मोठं नुकसानही होऊ शकतं. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका लहान मुलगी नकळतपणे अशी एक चूक करते, जी तिथे असलेल्या महिलेला भारी पडते.

व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आपण अनेकदा पाहतो की मुलं दिवसभर दंगा-मस्ती करत असतात. कोणतंही सामान उचलून ते कुठेही ठेवतात. लहान मुलांच्या खोड्यांमुळे मोठी माणसं नेहमीच त्रस्त असतात. कारण दिवसभर ते घरातील सामान इकडचं तिकडे करत असतात. या व्हिडीओमध्येही एका लहान मुलीने चुकून एक वस्तू आपल्या जागेवरून हलवली. मुलीची ही लहानशी चूक एका महिलेसाठी नुकसानदायक ठरली आहे.

बापरे! या स्कुटीवर नक्की कितीजण बसले आहेत? Viral Video पाहून नेटकरीही झाले हैराण

या Viral Photo मध्ये लपलेली मुलगी शोधणे इतके सोपे नाही; तुम्हीही करून पाहा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये एक कार्यक्रम सुरु असल्याचं आपण पाहू शकतो. या कार्यक्रमात मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांचा देखील समावेश आहे. या कार्यक्रमादरम्यान एका महिलेला एक रिकामी खुर्ची दिसते. ती ही खुर्ची स्वतःकडे खेचून त्यावर बसायला जाणार इतक्याच शेजारी उभी असलेली एक छोटी मुलगी चुकून खुर्ची काढते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की या मुलीने जाणूनबुजून खुर्ची काढली नाही.

मुलीने खुर्ची काढली आहे हे त्या महिलेला ठाऊक नसते आणि ती खुर्चीवर बसायला जाते. यानंतर ती महिला जोरात जमिनीवर पडते. महिला ज्याप्रकारे खाली पडते ते पाहून तिला खूप दुखापत झाली असावी असे वाटते. @ViralPosts5 नावाच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.