Breaking 122 Coconuts With One Hand Viral Video : आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये कोरण्यासाठी अनेक जण अजब-गजब स्टंट करीत असतात. यामध्ये कोणी हनुवटीवर खुर्ची ठेवतो, पत्त्यांच्या मदतीने घर बनवतो तर कोणी डोक्यावरचा एकेक केस मोजत बसतो. पण, आता एका रेकॉर्डब्रेकर माणसाने या सगळ्यांना मागे टाकत चक्क एका हाताने असंख्य नारळ फोडून दाखवले आहेत. अजब विक्रम करणाऱ्या या तरुणाबद्दल या लेखातून सविस्तर जाऊन घेऊया…

केरळमधील अभिष पी. डोमिनिक याने एका मिनिटात,एकाच हाताने सर्वाधिक नारळ फोडण्याचा विक्रम करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुवर्ण पानांवर स्वतःचे नाव कोरले आहे. अभिष पी. डोमिनिकने १४ वर्षांपूर्वी ११८ नारळ फोडले होते. त्याने आता एकाच हाताने १२२ नारळ फोडून स्वतःचा विक्रम मोडला आहे. व्हायरल व्हिडीओ केरळमधील आहे. कोट्टायम शहरात एका कठड्यावर ओळीत ठेवलेले नारळ फोडताना दिसतो आहे. ६० सेकंदांच्या कालावधीत, त्याने फक्त एका हाताने एकूण १२२ नारळ फोडले.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पहिले असेल की, एका ओळीत बरेच नारळ ठेवण्यात आले आहेत. सगळे नारळ त्याने एका झटक्यात फोडले आहेत. एवढेच नाही तर कुठेही तो थांबला नाही किंवा थकला सुद्धा नाही. त्याची जिद्द पाहून आसपासची मंडळी देखील त्याच्याकडे एकटक बघत राहिली. त्याचप्रमाणे जिंकल्यानंतर त्याला अज्ञात व्यक्तीने मिठी सुद्धा मारली.

व्हिडीओ नक्की बघा…

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणं मोठं आणि अशक्य वाटणारं स्वप्न (Viral Video)

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड जिंकल्यानंतर अभिष पी. डोमिनिक म्हणाला की, “गावातल्या साध्या माणसासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवणं खूप मोठं आणि अशक्य वाटणारं स्वप्न असतं. पण, अभिष पी. डोमिनिकने ते खरं करून दाखवल. मी दृढनिश्चयी माणूस आहे आणि मला इच्छाशक्तीवर पूर्ण विश्वास आहे” ; असे तो आवर्जून म्हणाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @guinnessworldrecords / @guinnessabheesh या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या अनोख्या विक्रमाचा व्हिडीओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने पोस्ट केला आणि तो सध्या सर्वच नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण – हा विक्रम खूपच वेगळा आणि थक्क करणारा आहे. नेटकरी अभिष पी. डोमिनिकच्या कौशल्याचे आणि मेहनतीचे खूप कौतुक करताना दिसत आहेत.