Viral Video: खांद्यावर जबाबदारीचे ओझे पडले की, माणसाला त्याच्या वयापेक्षा जास्त शहाणपण येते असे म्हणतात. अनेकदा घरातील वाईट परिस्थितीमुळे किंवा आई-वडिलांच्या निधनामुळे लहान वयात मुलं खूप मोठी होतात आणि शिक्षणासोबतच घर चालवण्यासाठी काहीतरी काम करतात. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप व्हायरल होताना दिसतात. सध्या अशाच एका १० वर्षांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो त्याच्या वडिलांच्या निधनानंतर काही फास्ट फूड विकताना दिसत आहे.

बरेच जण हल्ली फूड ब्लॉग बनवण्याला पसंती देत असून या फूड ब्लॉगर्सच्या माध्यमातून विविध खाद्यपदार्थ बनणाऱ्या अनेक विक्रेत्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्रिकेते केवळ प्रसिद्धीसाठी हा व्यवसाय करतात. पण, काही जण असेदेखील आहेत, जे केवळ आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे पोट भरण्यासाठी हा व्यवसाय करतात.

नुकताच व्हायरल झालेला हा व्हिडीओ दिल्लीतील असून हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध फूड ब्लॉगर सरबजित सिंगने त्याच्या @mrsinghfoodhunter या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला ब्लॉगर त्या फूड स्टॉलवरील जसप्रित नावाच्या मुलाला “त्याचे वय विचारतो.” यावर तो मुलगा ‘१० वर्ष’ असं सांगतो. त्यानंतर ब्लॉगर मुलाला “तू हे सर्व कोणाकडून शिकलास?” असं विचारतो. त्यावर तो मुलगा, “माझ्या वडिलांकडून शिकलो” असं सांगतो. पुढे ब्लॉगर त्याला “आता तुझे बाबा कुठे आहेत”, असं विचारतो, त्यावेळी तो मुलगा सांगतो की, “त्यांचे निधन झाले, त्यांना ब्रेन ट्यूमर झाला होता.” यावर ब्लॉगर त्याला विचारतो, “मग आता कुटुंबात आणखी कोणी कमावत नाही का?” यावर तो सांगतो, “मी आणि माझी १४ वर्षांची बहीण आम्ही दोघं हे काम करतो, आमची आई पंजाबला गेल्यानंतर आम्ही आमच्या काकांसोबत रहात आहोत.” यावर तो ब्लॉगर जसप्रितला सांगतो की, “तुला लोक खूप प्रेम देखील, तू खूप मोठा होशील.” यावेळी फूड ब्लॉगरसोबत बोलता बोलता जसप्रितने चिकन एग रोल बनवला. त्याच्या स्टॉलवर चिकन रोल, कबाब रोल, पनीर रोल, चाउमीन रोल आणि सीख कबाब रोलदेखील तो बनवतो.

हेही वाचा: बैलगाड्याचा नाद! शेतकऱ्याच्या मुलाने लग्नात घेतली जबरदस्त एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून युजर्स यावर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हे ठिकाण कुठे आहे, मला या मुलाची मदत करायची आहे.” तर दुसऱ्याने लिहिलंय की, “देवा या मुलाचे रक्षण कर”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “तूच खरा हिरो”, तसेच अनेक युजर्स कमेंटमध्ये जसप्रितला मदतीचा हात देणार असल्याचं म्हणत आहेत.

आनंद महिंद्रा यांची पोस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओने महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचे लक्ष वेधून घेतले. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी जसप्रीतच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. यावेळी त्यांनी त्यांच्या x (ट्वीटर) अकाउन्टवर लिहिले की, “हिम्मत, तुझे नाव जसप्रीत आहे. पण त्याच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये. मला विश्वास आहे, तो टिळक नगर, दिल्लीत आहे. कोणाला त्यांच्या संपर्क क्रमांकावर प्रवेश असल्यास कृपया तो शेअर करा. महिंद्रा फाऊंडेशनची टीम आम्ही त्याच्या शिक्षणसाठी मदत करु”, असं आनंद महिंद्रा यांनी लिहिले आहे.